Palghar Accident : पालघर अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत वितरित

मुंबई : पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनंतर एकूण ६५ लाख रुपयांच्या मदतीची रक्कम जिल्हाधिकारी, पालघर यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. (Palghar Accident)


घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून संबंधित प्रशासकीय आदेशही जारी करण्यात आले आहेत. (Palghar Accident)


१८ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे चार वाजण्याच्या दरम्यान डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरात टेम्पो आणि कंटेनरची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला होता. अपघात इतका गंभीर होता की टेम्पोचा पूर्ण चुराडा झाला. या दुर्घटनेत १३ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत व बचावकार्य सुरू केले. जखमींना त्वरित जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. (Palghar Accident)

जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत देण्यास तातडीने मंजुरी दिली. या प्रकरणी मृतांच्या वारसांची पडताळणी करून मंजूर मदत तातडीने वितरित करण्याबाबत जिल्हा प्रशासनास निर्देश देण्यात आले आहेत. (Palghar Accident)



अपघातात मृतांची नावे :


या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सुरेश रत्ना लाखात (वय ४७), पांडू गणपत लाखात (वय ४५), कलु गोविंद लाखात (४८), सुनील अर्जुन दांडेकर (वय ३५), चिमा गोविंद कुऱ्हाडा (वय ७५), नमिता विठठ्ल दांडेकर (वय १४), सारीका संतोष लाखात (वय ३८), आयुष्य सिताराम लाखात (वय १६), सागर नामदेव शेंडे (वय १५), वसंत शिवराम वळवी (वय ४०), सलोनी शिवराम वळवी (वय १२), अजय चंदर आहाडी (वय १९) आणि रियांशी संतोष लाखात (वय ४) सर्व राहणार बापूगाव यांचा समावेश आहे. (Palghar Accident)



- रामेश्वर नाईक, कक्ष प्रमुख, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष :


अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून मदत वाटपाची प्रक्रिया जलद केली आहे. तसेच इतर आवश्यक प्रशासकीय कामेही प्राधान्याने पूर्ण केली जात आहेत. (Palghar Accident)

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि