Congress News : काँग्रेसचे चंद्रपुरातील ३९ हून अधिक नगरसेवक 'नॉट रिचेबल'

- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग


मुंबई : १८ जून रोजी होणाऱ्या वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या बालेकिल्ल्याला मोठा सुरुंग लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ५ नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील काँग्रेसचे ३९ हून अधिक नगरसेवक अचानक 'नॉट रिचेबल' झाले असून, ते अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.



वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील एकूण ९७७ मतदार विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर विदर्भातील ही पहिलीच मोठी स्थानिक निवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. महायुतीकडून मते फुटू नयेत आणि महाविकास आघाडीची मते आपल्याकडे वळवता यावीत, यासाठी पडद्यामागे जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. काँग्रेसचे एवढ्या मोठ्या संख्येने नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.



चंद्रपूर महापालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसमध्ये वडेट्टीवार गट आणि धानोरकर गट अशी उघड रस्सीखेच पाहायला मिळाली होती. अगदी महापौर पदाच्या फॉर्म्युल्यावरूनही दोन्ही गटांत वाद दिल्लीदरबारी पोहोचला होता. याच पक्षांतर्गत धुसफुशीचा आणि स्थानिक नेत्यांमधील नाराजीचा फायदा घेत सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क साधून त्यांना आपल्या गोटात खेचल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. हे सर्व नगरसेवक सध्या राज्याबाहेर किंवा गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याची चर्चा आहे.



विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा पणाला :


ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरातून नगरसेवक 'नॉट रिचेबल' झाल्यामुळे विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व आणि वडेट्टीवार आता या नगरसेवकांशी पुन्हा संपर्क साधून त्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होतात की भाजप या निवडणुकीत बाजी मारते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण