Pune Wife Murder Case : पतीने पत्नीच्या डोक्यात टाकला चक्क गॅस सिलिंडर; पतीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा !

पुणे : पुण्यात लेबर कॅम्पमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यात ५ किलोचा गॅस सिलिंडर घालून तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी ने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली . त्यानंतर पोलिसानी ताबोडतोब तपास सुरू केला .


पुण्यातील येवलेवाडी परिसरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. कौटुंबिक वाद आणि चारित्र्याच्या संशयावरून पती आणि पत्नी मध्ये झालं टोकाच भांडण . रागाच्या भरत पती ने पत्नी च्या डोक्यात टाकला ५ किलो वजनाचा सिलेंडर . ही घटना बांधकाम मजुरांच्या कॅम्पमध्ये (लेबर कॅम्प) घडली असून हत्येनंतर आरोपी पतीने स्वतःहून पोलीस ठाणे गाठत गुन्ह्याची कबुली दिली आहे.



कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचळले पतीने |


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पती आणि मृत महिला येवलेवाडी परिसरातील एका बांधकाम प्रकल्पाच्या लेबर कॅम्पमध्ये वास्तव्यास होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये काही क्षुल्लक कारणांमुळे जोरदार भांडण झाले. या भांडणादरम्यान पतीचा राग अनावर झाला आणि त्याने घरात असलेला पाच किलोचा वजनाचा गॅस सिलिंडर उचलून पत्नीच्या डोक्यात घातला. हा वार इतका भीषण होता की, गंभीर दुखापत झाल्याने महिलेचा मृत्यू झाला.



हत्येनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर |

आपल्या पत्नीची हत्या केल्यानंतर थेट जवळचे पोलीस ठाणे गाठले, केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली. आरोपीने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे पोलीसही आश्चर्य चकित झाले . पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.



घटनास्थळी पोलिसांची धाव; तपास सुरू |


घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला महिलेचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोस्टमार्टेमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून हत्येसाठी वापरलेला सिलिंडर जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, या घटनेमुळे लेबर कॅम्पमधील कामगारांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.

Comments
Add Comment

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने