Idris Nayakwadi : इद्रीस नायकवाडी राजीनामा दो ! सुनेत्रा पवार यांची सूचना; कार्यशैली अमान्य असल्याने युवा नेतृत्वाची नाराजी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपाल नियुक्त आमदार इद्रीस नायकवाडी यांना पक्षनेतृत्वाने राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेवरून राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची चर्चा असून, नायकवाडी यांच्या कार्यशैलीवर युवा नेतृत्व नाराज असल्याचे कळते आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नसल्याची भूमिका नायकवाडी यांनी घेतल्याने पक्षात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.


अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्याने (ओएसडी) इद्रीस नायकवाडी यांची भेट घेतली होती. याच भेटीत त्यांना पक्षाच्या वतीने राजीनामा देण्याची सूचना देण्यात आल्याचे समजते. मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत नायकवाडी यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेला येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.


राजीनाम्याच्या चर्चेवर बोलताना इद्रीस नायकवाडी यांनी मात्र या वृत्ताचे खंडन केले आहे. "उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी हे मंत्रालयात सातत्याने भेटत असतात. परंतु, मला कोणत्याही नेत्याकडून किंवा पक्षाकडून राजीनामा मागण्यात आलेला नाही," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. तसेच, "यापूर्वी दिवंगत नेते अजित पवार यांच्याकडून मला अशी कोणतीही सूचना कधीही देण्यात आली नव्हती. त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.



राजीनाम्यासाठी दबाव का ?


दिवंगत नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘अल्पसंख्याक चेहरा’ म्हणून नायकवाडी यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर पक्षांतर्गत समीकरणे बदलली आहेत. सध्या झिशान सिद्दीकी यांच्या रूपाने राष्ट्रवादीचा एक युवा आमदार विधानपरिषदेत अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यातच पक्षातील नवोदित युवा नेतृत्वाला नायकवाडी यांची कार्यशैली मान्य नसल्याने एकाच समाजाचे दोन प्रतिनिधी ठेवण्याऐवजी नायकवाडींना पदमुक्त करण्याची हालचाल सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Comments
Add Comment

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म