Rahul Narvekar : 'बकरी ईद' निमित्त अवैध जनावर वाहतुकीवर कारवाईचे निर्देश, राहुल नार्वेकर यांचे पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : राज्यात “बकरी ईद” निमित्त संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र पोलीस महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त यांना पत्र पाठवत संभाव्य गोवंश हत्या रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


महाराष्ट्र राज्यात संपूर्ण गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू असून, दिनांक २८ मे २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या “बकरी ईद”च्या पार्श्वभूमीवर काही भागांत मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या होण्याची शक्यता आहे. विशेषतः मालेगाव-नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये विशेष दक्षता घेण्याचे निर्देश पत्रात दिले आहेत.



स्थानिक पोलीस प्रशासनाने संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी, अवैध जनावर वाहतूक रोखावी, तसेच गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणालेत. तसेच, गोसंरक्षणासाठी कार्य करणाऱ्या गोरक्षकांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक ती प्रतिबंधात्मक आणि सुरक्षात्मक कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


दरम्यान, या पत्रामुळे राज्यातील “बकरी ईद”च्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्याबाबत हालचाली सुरू झाल्याची माहिती पोलिस विभागाकडून मिळत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी