IPS Priyanka Narnaware : एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारीपदी आयपीएस प्रियांका नारनवरे रुजू

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी या महत्त्वपूर्ण पदावर उपमहानिरिक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांनी आज, गुरुवार दि. २४ मे २०२६ रोजी कार्यभार स्वीकारला.



महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित प्रशासकीय सोपस्कारांनंतर त्यांनी अधिकृतपणे पदभाjर स्वीकारला.


दरम्यान परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पत्र लिहून गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या एसटी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पदावर शासनाने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी असा आग्रह धरला होता. नुसार शासनाने उप महानिरीक्षक दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची एस टी महामंडळाच्या मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.



एसटी महामंडळ हे राज्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. दररोज लाखो प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पार पाडणाऱ्या महामंडळात सुरक्षा व दक्षता विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते.


महामंडळाची मालमत्ता, उत्पन्न स्रोतांचे संरक्षण, तिकीट व महसूल गैरव्यवहारांना प्रतिबंध तसेच अंतर्गत प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता राखण्याची जबाबदारी या विभागावर असते.



प्रियांका नारनवरे या अनुभवी आणि कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी असून, पोलीस प्रशासनातील त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ एसटी महामंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेला आणि दक्षता यंत्रणेला निश्चितच होणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महामंडळातील प्रशासकीय शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.


नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा व दक्षता विभाग अधिक गतिमान, प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने कार्य करेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने