नाशिकमध्ये खळबळ ! जमिनीचा वाद टोकाला, वादातून महिलेच्या अंगावर घातला ट्रॅक्टर

नाशिक : नाशिकमधील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथे जमिनीचा वाद टोकाला गेल्यानंतर भयानक घटना घडली आहे. न्यायप्रविष्ठ शेत जमिनीच्या भाऊबंदकीत वाद उफाळून आल्याने वादग्रस्त शेत जमिनीवरील नांगरणी थांबविण्यासाठी पुढे आलेल्या महिलेच्या अंगावर ट्रॅक्टर घातला गेल्याने त्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी तक्रारी दिल्या आहेत. तक्रारीवरून १७ जणांविरोधात पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.



नेमकं काय घडलं ?


अजय गोसावी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पिंपळगाव बसवंत येथे राष्ट्रीय महामार्गालगत त्यांची शेत जमीन आहे. दोन्ही जमीन गटाचे वाद न्यायप्रविष्ट आहे. या जमिनीवर ट्रॅक्टरद्वारे नांगरणी होत असल्याचे समजताच त्यांनी पत्नी रेश्मा, पुतण्या पवन गोसावी, वहिनी विजया आणि सुवर्ण गोसावी, पुतण्या शेखर व सावन गोसावी यांच्यासह त्यांनी शेतात धाव घेतली.


यावेळी न्यायालयीन वादाचा संदर्भ देत निकाल लागलेला नाही, त्यामुळे ट्रॅक्टरचालकाला नांगरणी थांबविण्यास सांगितले. तेव्हा ट्रॅक्टर चालक संशयित अजय उन्हाळे (रा.नारायण टेंभी) याने काहीच न ऐकता आपल्यासह पत्नीशी हुज्जत घातली, असे तक्रारदाराने नमूद केले आहे. अंगावर ट्रॅक्टर घातल्याने पत्नी रेश्मा गंभीर जखमी झाल्या. तिचा पाय पुढील टायरखाली दाबला गेला. डोक्याला व बरगडीला मार लागला. वहिनी सुवर्णा गोसावी तिला वाचवण्यासाठी धावली असता ट्रॅक्टरचा धक्का लागून त्यांनाही दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.



यावेळी ऋषिकेश गोसावी, अभिषेक गोसावी, रेणू गोसावी, निनाद गोसावी, सृष्टी गोसावी, स्मिता गोसावी, नितीन गोसावी (सर्व राहणार गोसावी वाडा, पिंपळगाव बसवंत) उपस्थित होते. ऋषिकेश गोसावीने चालकाला ट्रॅक्टर न थांबवता सुरूच ठेवण्याचा इशारा केला. आपल्यासह नातेवाईकांना शिवीगाळ करीत ट्रॅक्टर तुमच्या अंगावर घालू अशी धमकी दिली. दरम्यानच्या काळात घटनास्थळावरून पळालेल्या ट्रॅक्टर चालकाला पुतण्याने पकडले. जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. जखमी रश्मी गोसावी रुग्णालयात दाखल आहेत. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक अजय उन्हाळेसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दुसऱ्या बाजूने या प्रकरणात रेणू गोसावी यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या ताब्यातील शेतात जबरदस्तीने प्रवेश करून ट्रॅक्टर चालकास शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. ट्रॅक्टरची चावी काढून घेतल्याने निर्माण झालेल्या गोंधळात संबंधित महिलेला दुखापत झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शेतजमिनीचा वाद कसा आणि किती टोकाला जाऊ शकतो हे या प्रकरणात दिसून येतं.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे