Mr. India Movie 'Mogambo' : मिस्टर इंडियाच्या 'मोगँबो' साठी अमरीश पुरी नव्हे तर 'या' अभिनेत्याची झालेली पहिली निवड !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात मैलाचा ठसा उमटवणाऱ्या 'मिस्टर इंडिया' (१९८७) या चित्रपटाला २५ मे रोजी ३९ वर्षे पूर्ण झाली आहेत. दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या या अभिजात चित्रपटातील 'मोगँबो' (Mogambo) हा खलनायक (villain) आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अमरीश पुरी (Amrish Puri) यांनी ही भूमिका अजरामर केली. पण तुम्हाला माहीत आहे का, या भूमिकेसाठी अमरीश पुरी हे निर्मात्यांची पहिली पसंती नव्हते तर या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर (Anupam Kher) यांची निवड करण्यात आली होती.



विशेष म्हणजे अनुपम खेर (Amrish Puri) यांची स्क्रीन टेस्टही झाली होती. त्यानंतर काही दिवस शूटिंगही केले होते. मात्र, त्यांचा लुक स्केरी वाटण्याऐवजी विनोदी वाटू लागल्याने शेखर कपूर यांनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेखर कपूर यांनी अमरीश पुरी यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी ते 'लोहा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. बोनी कपूर (Boney Kapoor) आणि शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनी त्यांची ऊटी येथे भेट घेऊन त्यांना या रोलसाठी तयार केले. या चित्रपटासाठी अमरीश पुरी (Amrish Puri) यांना तब्बल १ करोड रुपयांचे मानधन देण्यात आले होते.



ज्यामुळे ते त्या काळातील सर्वात महागडे खलनायक (villain) ठरले. अनिल कपूर आणि श्रीदेवी (Sridevi) यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट केवळ ३.८ करोड रुपयांच्या बजेटमध्ये तयार झाला होता. त्याने बॉक्स ऑफिसवर १० करोड रुपयांपेक्षा जास्त गल्ला जमवला होता. हा त्यावेळचा रेकॉर्डब्रेक गल्ला होता. विशेष म्हणजे, बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद यांचा हा एकत्र लिहिलेला शेवटचा चित्रपट होता. १९८२ मध्येच या जोडीमध्ये फूट पडली होती. पण त्यांनी आधीच लिहलेली ही स्क्रिप्ट 'मिस्टर इंडिया'च्या रूपाने पडद्यावर आली. या चित्रपटानंतर दोघांनी अधिकृतपणे आपले मार्ग वेगळे केले.



बॉलिवूडचा सर्वात खतरनाक खलनायक (Villian) म्हणून 'मोगॅंबो' आज ही घराघरात ओळखला जातो. 'मिस्टर इंडिया' चित्रपटाला २५ मे रोजी प्रदर्शित होऊन मोठा काळ लोटला असला, तरी अमरीश पुरी यांचा 'मोगॅंबो खुश हुआ' हा डायलॉग आजही लोकांच्या जिभेवर आहे. पण, या आयकॉनिक रोलशी जोडलेला एक रंजक इतिहास समोर आला आहे. आयएमडीबीच्या (IMDB) रिपोर्टनुसार, या भूमिकेसाठी आधी अनुपम खेर (Anupam Kher) यांना साईन करण्यात आले होते. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी काही सीन शूटही केले होते, पण त्यांचा लुक मोगँबोच्या क्रूरतेचा अनुभव देऊ शकला नाही. दिग्दर्शकाला मोगँबोच्या रूपात एक घाबरवणारा चेहरा हवा होता. म्हणून अनुपम खेर (Anupam Kher) यांना या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले.

Comments
Add Comment

Dhanush-Mammootty Movie : धनुष आणि ममूटी पहिल्यांदाच एकत्र झळकणार ? ‘OM: Chapter 1’ चित्रपटाची चर्चा, रिलीज डेट आली समोर

Dhanush-Mammootty Movie : दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलाकार एकाच चित्रपटात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चेने

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Rajya Natya Spardha : राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांना २५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना

Ranbali Movie Review : कागदावर धमाकेदार, पण पडद्यावर फिका? 'रणबाली' चित्रपट कसा आहे ?

साऊथचा लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडाच्या (Vijay Devarkonda) बाबतीत एकच गोष्ट वारंवार घडताना दिसते. त्याच्या एखाद्या

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण