कांदा प्रश्नी केंद्र व राज्य सरकारची बुधवारी बैठक

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तीव्र आंदोलनामुळे (कांदा दर आणि अनुदानाचा प्रश्न) राज्याचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. या महत्त्वाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी (२७ मे ) नवी दिल्लीत केंद्र आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांची एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.



कांद्याचा उत्पादन खर्च १८ ते २० रुपये प्रति किलो येत असल्याने, शासनाने कांद्याची थेट २४ रुपये प्रति किलो दराने खरेदी करावी आणि यापूर्वी विकलेल्या कांद्याला प्रति क्विंटल एक हजार ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत. राज्य शासनाने नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदीचे दर १२.३५ रुपयांवरून थेट १५.८० रुपये प्रति किलोपर्यंत वाढवले आहेत. मात्र, हा दर अपुरा असल्याने शेतकरी आक्रमक आहेत.या बैठकीत कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत आणि दीर्घकालीन निर्यात धोरणाबाबत केंद्र सरकारशी चर्चा केली जाणार आहे.



या बैठकीत कांदा खरेदीचे दर वाढवणे आणि शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत केंद्र व राज्य सरकारमध्ये चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातील कांदा दराच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून नाशिकमधील चांदवड येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलनही केले आहे. मात्र, हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्य सरकारने कांदा खरेदीचा दर साडेतीन रुपयांवरून थेट १५ रुपयांपर्यंत नेला आहे. मोठ्या प्रमाणावर खरेदी सुरू केली असून केंद्र सरकारसोबत सातत्याने चर्चा सुरू आहे’. केंद्र सरकारसोबत बुधवारी बैठक होणार असल्याची माहिती देत, दीर्घकालीन उपाययोजनांवर विचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि