संत नामदेव

बाप कवणाचा माय कवणाची
बाप कवणाचा माय कवणाची ।
सोयरी धायरी तेही कवणाची ॥
द्रव्य संपत्ती देखती तंवचि मानिती ।
सरलिया कवणावे कवण म्हणती ॥
स्तनपान देउनीया वाढवी माउली ।
तेही अंतकाळी वेगळी ठेवी ॥
नामा म्हणे पाप पुण्य हे संगाती ।
येर अवघी भ्रांती अरे मना ॥


लौकिक संसारातील नाती वरवरची असतात. सोयरी-धायरी, सगेसोयरे हे फक्त सुखाच्या काळी आपल्याबरोबर असतात. कठीण वा संकटाच्या समयी कोणीही आपल्याबरोबर नसतो. शिशिर ऋतूत पाखरे झाडांना सोडून जातात, तसेच दुःखाच्या काळात सगेसोयरे, आप्त आपल्यापासून दूर असतात.
या अभंगात संत नामदेव म्हणतात, "हे मना, हा बाप आणि आईदेखील आपली नाही. सोयरी-धायरी मंडळीही आपली नाहीत. जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे, तोपर्यंतच ही मंडळी आपल्याला मान देतात. आपण मेल्यावर ओळखदेखील विसरतात. ज्या माउलीने आपल्याला स्तनपान देऊन मोठे केले ती आईसुद्धा अंतकाळी दूर होते. केवळ आपल्या पापपुण्याची शिदोरीच आपल्या बरोबर असते. अन्य साऱ्या गोष्टी खोट्या आहेत असे मानावे."
संतांना मानवी संसाराच्या क्षणभंगुर स्वरूपाची जाणीव असते. ते समाजाचे हितचिंतक आणि मार्गदर्शक असतात. म्हणूनच ते लोकांना जागृत करून वारंवार कृत्रिम वा वरवरच्या नात्यांपासून सावध राहावे असा इशारा करीत असतात. संकटात वा अडचणीच्या प्रसंगी कोणीही आप्त साथ देत नाही. माणसाला साथ करते ती त्याची नियती. ही नियती आपल्या चांगल्या कर्मांमधून निर्माण झालेली असते.
संसाराच्या क्षणभंगुर स्वरूपाविषयी अनेक संतांनी लिहिले आहे. संत तुकाराम म्हणतात,
क्षणभंगुर नाही भरवसा ।
व्हा रे सावध तोडा माया आशा॥
संत कबीर म्हणतात,
कबिरा गर्व न कीजियै, उँचा देख अवास।
काल्ह परै भुं लेटना, ऊपर जमसी घास॥
हे जग क्षणभंगुर आहे. अभिमान बाळगावा अशी बाब जगात नाही. माणूस मोठ्या इमारती बांधतो आणि गर्वाने सांगतो की बघा मी केवढी मोठी इमारत बांधली आहे. पण हा गर्व फार काळ टिकत नाही.
Comments
Add Comment

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

Navratri 2026: शारदीय नवरात्री का साजरी केली जाते? चैत्र नवरात्रीपेक्षा नेमकं काय वेगळं? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मात नवरात्रीचं विशेष महत्व आहे. या नऊ दिवसात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. तसं पाहिलं तर

Navratri Kalash: नवरात्रीच्या कलशात काय टाकावं? तुम्ही ही चूक तर करत नाही ना!

शारदीय नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. पितृपक्ष संपला की दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते. अश्विन महिन्यातील

Sarvapitru Amavasya 2026 : पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नाही, ‘हा’ दिवस ठरणार महत्त्वाचा ! संपूर्ण पितृपक्षाचं पुण्य मिळवण्याची विशेष संधी

Sarvapitru Amavasya 2026 : हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील शेवटची तिथी म्हणजेच

Navratri Festival : यंदा नवरात्रीत अष्टमी-नवमी एकाच दिवशी, जाणून घ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंतच्या महत्त्वाच्या तारखा

Navratri Festival : नवरात्रोत्सवाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांसाठी यंदाचं नवरात्र विशेष ठरणार आहे. देवीच्या नऊ

Navratri 9 Days Colours 2026: नवरात्रीच्या ९ दिवसांचे रंग कोणते ? पाहा संपूर्ण यादी

Navratri 9 Days Colours 2026: शारदीय नवरात्रौत्सवाला यंदा ११ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये