अपघातग्रस्त कामगारांच्याबाबत प्रत्यारोपण शस्त्रक्रियांच्या तातडीसाठी उपाययोजना करा; कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई : राज्यातील कारखान्यांमध्ये आणि औद्योगिक कंपन्यांमध्ये मशीनवर काम करताना अपघात होऊन हात गमावावा लागलेल्या कामगारांना पुन्हा पूर्ववत आयुष्य जगता यावे. अपघातग्रस्त कामगारांवर तातडीने शस्त्रक्रिया करून त्यांचे तुटलेले हात पुन्हा प्रत्यारोपित करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश कामगार मंत्री अँड आकाश फुंडकर यांनी दिले. या संदर्भातील प्रायोगिक तत्वावर पुणे जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमध्ये उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचनाही कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी दिल्या.


याबाबत नरिमन भवन येथे आयोजित बैठकीत मंत्री बोलत होते. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. तर प्रत्यक्षरीत्या अपर मुख्य सचिव आय ए कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उपसचिव दीपक पोकळे उपस्थित होते.अपघात झाल्यास पहिल्या काही तासांचा अवधी अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यामुळे हात प्रत्यारोपण करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांची अद्ययावत माहिती सर्व कारखाने आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये असणे अनिवार्य करण्यात यावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कामगारांना तातडीने मदत मिळेल. कामगारांना किंवा व्यवस्थापनाला अपघाताच्या वेळी त्वरित संपर्क साधता यावा आणि पुढील वैद्यकीय मार्गदर्शनासाठी दिशा मिळावी, यासाठी 'हेल्पलाईन क्रमांक' जारी करण्यात यावा, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.

Comments
Add Comment

Mumbai CNG Price : सीएनजी आणि पीएनजी महागला, नवे दर १ सप्टेंबरपासून लागू

मुंबई : महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ मंगळवार १

Anna Hazare : अण्णा हजारेंची प्रकृती खालावली, मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात

Central Railway : मध्य रेल्वे २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा पुरवणार

मुंबई : मध्य रेल्वेने आगामी गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी आणि गर्दीचे नियोजन

Nepal Flood : नेपाळ आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ६७ जणांच्या संपर्कासाठी प्रयत्न

मुंबई : नेपाळ-तिबेट प्रदेशात २६ ऑगस्ट २०२६ रोजी आलेल्या महापुरामध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक

Western Railway : पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक आजपासून लागू; ६ नव्या लोकल

वातानुकूलित लोकलच्या सेवांमध्येही वाढ मुंबई : ३१ ऑगस्ट२०२६ पश्चिम रेल्वेचे सुधारित उपनगरीय वेळापत्रक मंगळवार

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर