Petrol Diesel Stock in Maharashtra : राज्यात इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन

मुंबई : राज्यात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवा पसरत असतानाच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. राज्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून जाऊन अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, असे स्पष्ट करत त्यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. (Petrol Diesel Stock in Maharashtra)


गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेल तुटवड्याच्या विविध अफवा व्हायरल होत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. काही नागरिकांनी अतिरिक्त इंधन साठवण्यास सुरुवात केल्याने अनेक भागांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. (Petrol Diesel Stock in Maharashtra)



या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, राज्यातील सर्व तेल कंपन्यांकडे पुरेसा इंधन साठा उपलब्ध आहे. पुरवठा सुरळीत सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच विनाकारण घबराट निर्माण करून अतिरिक्त इंधन खरेदी करणे टाळावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Petrol Diesel Stock in Maharashtra)


भुजबळ म्हणाले की, “राज्यात कुठेही इंधन तुटवड्याची परिस्थिती नाही. पुरवठा व्यवस्थेवर सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि गरजेपुरतेच इंधन खरेदी करावे.” (Petrol Diesel Stock in Maharashtra)



दरम्यान, प्रशासनाकडूनही पेट्रोल पंप चालकांना योग्य प्रमाणात इंधन वितरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचाही इशारा प्रशासनाने दिला आहे. (Petrol Diesel Stock in Maharashtra)


सरकारच्या या स्पष्टीकरणानंतर आता नागरिकांमधील संभ्रम दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी