महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या सर्व जागा लढवणार

 काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा; दोन दिवसांत जागावाटप अंतिम करणार


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या १६ जागा आणि नागपूरमधील एका जागेची पोटनिवडणूक अशा सर्व १७ जागांवर महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. या निवडणुकीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा मुंबईतील काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’ येथे पार पडली. येत्या दोन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन सर्वसंमतीने अंतिम जागावाटप जाहीर केले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी दिली.


या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, तसेच उबठाचे आमदार अनिल परब, अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीसह इतर महत्त्वाच्या राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.प्राथमिक चर्चेनुसार, महाविकास आघाडीतील १७ जागांपैकी काँग्रेस सात ते आठ जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. तर उबाठा गट पाच ते सहा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तीन ते चार जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या पक्षाला कोणती जागा सुटणार, याचा अंतिम निर्णय २९ तारखेला होणाऱ्या मविआ नेत्यांच्या पुढील बैठकीत स्पष्ट होणार आहे.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे