Mumbai Crime : हायप्रोफाइल टॉवरमध्ये सुरू होता ड्रग्जचा काळाबाजार; उग्र वासामुळे पोलिसांनी टाकला छापा, मैत्रिणीसह तिघे ताब्यात...

Crime News : दक्षिण मुंबईतील आग्रीपाडा परिसरातील हायप्रोफाइल यास्मीन टॉवरमध्ये सुरू असलेला ड्रग्जचा मोठा रॅकेट मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. २३ मजली इमारतीच्या १०व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी प्रयोग शाळा उभारण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका बांगलादेशी महिलेसह तिघांना अटक केली आहे. तब्बल ५१ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.


अटक करण्यात आलेल्यांमध्ये शोएब मन्सुरी (३१), सुफियान मन्सुरी (२८) आणि मामुनी सरकार (२७) यांचा समावेश आहे. आरोपी फ्लॅटच्या स्वयंपाकघरात रासायनिक प्रक्रिया करून एमडी ड्रग्ज तयार करत होते. पोलिसांनी छाप्यात मोठ्या प्रमाणात कच्चा माल, तयार ड्रग्ज, पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.


मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला (Mumbai Police anti-narcotics squad) आग्रीपाडा भागात शंकास्पद हालचालींबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर कांदिवली युनिटच्या पथकाने यास्मीन टॉवरवर छापा मारला. फ्लॅटमध्ये प्रवेश करताच उग्र रासायनिक वास आणि प्रयोगशाळेसारखी उपकरणे पाहून पोलिसांनाही धक्का बसला.तपासात उघड झाले की, ड्रग्ज तयार करण्यासाठी आरोपींनी हा फ्लॅट खास घेतला होता. दरमहिने ४५ हजार रुपयांनी घेतलेल्या या फ्लॅटमध्ये ड्रग्ज बनवण्याचा उपक्रम केला जात होता . बाहेर वास जाऊ नये म्हणून ते सतत एसी सुरू ठेवत आणि धूप-कापराचा वापर करत होते.मुख्य आरोपी शोएब मन्सुरी विरोधात यापूर्वीच २१ गंभीर गुन्हे दाखल आहेत. ड्रग्ज व्यवसायात दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने शस्त्रसाठाही ठेवला होता. ही शस्त्रे कुठून आणली आणि या रॅकेटमागे आणखी कुणाचा-कुणाचा हात आहे, याची सखोल तपासणी पोलीस करत आहेत

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने