Sangli Crime News : तू मागच्या जन्मीची नागीण… सांगलीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ३ भोंदू बाबांना अटक, साडेचार लाखांची फसवणूक

महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणि अंधश्रद्धेचा भयानक चेहरा समोर आणणारी एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील विटा येथे उघडकीस आली आहे. तू मागच्या जन्मीची नागीण होतीस आणि संकेतबाबा नाग होता, अशी बतावणी करून एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विटा पोलिसांनी तीन भोंदू बाबांना अटक केली आहे. या नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून मुलीला ब्लॅकमेल देखील केले. ​या प्रकरणी पोलिसांनी महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये या तिघांविरोधात पॉक्सो (POCSO) कायदा आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील कडेश्वर धामच्या या तिन्ही भोंदू बाबांनी स्वतःमध्ये महापुरुषांचा संचार असल्याचा बनाव रचला होता. त्यांनी पीडित मुलीला तिच्या पूर्वजन्माची खोटी कथा सांगून जाळ्यात ओढले. या जन्मी तुमचे लग्न व्हावे म्हणूनच तुझा जन्म झाला आहे, असे सांगून त्यांनी मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केला.

​व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग आणि अघोरी कृत्ये



​या भोंदू बाबांची विकृती एवढ्यावरच थांबली नाही, तर त्यांनी या अत्याचाराचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी पीडितेचे लैंगिक शोषण सुरूच ठेवले.

पूजेच्या नावाखाली ४.५ लाखांची लूट


​या भोंदूंनी केवळ मुलीचेच शोषण केले नाही, तर तिच्या कुटुंबालाही अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढले. घरात सुख-शांती लाभण्यासाठी आणि पूजा-हवन करण्यासाठी त्यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून तब्बल साडेचार लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

नाशिकच्या घटनेनंतर सांगलीत खळबळ

​काही दिवसांपूर्वीच नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे काळे कारनामे समोर आले होते. महिलांचे लैंगिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या खरात प्रकरणानंतर आता सांगलीतील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. विटा पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण