PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींचे मंत्र्यांना आवाहन: इंधन बचतीसाठी कारपूलिंगचा अवलंब करा; प्रशासनात शिस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतींवर भर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना इंधन बचत आणि संसाधनांचा योग्य वापर यासाठी कारपूलिंगचा अवलंब करण्याचे स्पष्ट आवाहन केले.


बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले, “जेव्हा आपण एकाच ठिकाणाहून निघून एकाच ठिकाणी जातो, तेव्हा कारपूलिंगचा पर्याय का निवडू नये?” त्यांच्या या सूचनेमागे केवळ इंधन बचत नव्हे तर प्रशासनात शिस्त, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक दृष्टीकोन रुजवण्याचा संदेश असल्याचे मानले जात आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) अलीकडील काळात आपल्या सुरक्षा ताफ्याचा आकार कमी करण्याचे निर्देश दिले असून, मंत्र्यांनाही त्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या मर्यादित ठेवण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर इंधन वापर कमी करणे, खर्चात कपात करणे आणि कार्बन उत्सर्जन घटवणे या उद्दिष्टांवर सातत्याने भर दिला जात आहे.



या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारकडून नागरिकांनाही सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे, तसेच वैयक्तिक वाहनांचा वापर शक्य तितका कमी करण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान बदल आणि प्रदूषण नियंत्रणाच्या व्यापक धोरणाचा हा भाग असल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. (PM Narendra Modi)


याच बैठकीत पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) मंत्र्यांना जनतेशी अधिक सक्रिय संवाद साधण्याचा आणि नियमितपणे लोकांमध्ये वेळ घालवण्याचा सल्ला दिला. यामुळे धोरणनिर्मिती अधिक लोकाभिमुख होईल आणि सरकार–जनता संवाद अधिक मजबूत होईल, असे त्यांनी नमूद केले.



दरम्यान, पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अलीकडील जनसंपर्क मोहिमेचे विशेष कौतुक केले. सिक्कीम दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांशी नेपाळी भाषेत संवाद साधून लोकांशी थेट जोडण्याचा प्रयत्न केल्याचे उदाहरण म्हणून याचा उल्लेख करण्यात आला.


या संदेशानंतर बैठकीनंतरच्या घडामोडींमध्येही त्याचा परिणाम दिसून आला. बुधवारी संध्याकाळी काही राज्यमंत्री एकाच वाहनातून कर्तव्य भवन-३ येथे पोहोचले आणि तेथून आयोजित प्रगती बैठकीत व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले. या घडामोडीमुळे प्रशासनात पंतप्रधानांच्या सूचनांचा तत्काळ प्रभाव दिसून आल्याचे मानले जात आहे. (PM Narendra Modi)

Comments
Add Comment

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

Himachal Pradesh: बर्फवृष्टीमुळे हिमाचलमध्ये निसर्गाचं नयनरम्य दृश्य, धरतीवरील नंदनवनात हिवाळ्याची चाहूल!

शिमला शिमलातील बर्फवृष्टी पाहण्यासाठी असते. शिमलाचे फोटो सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बर्फवृष्टी

Navi Mumbai Airport आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तयार नाही? एमिरेट्सचा दावा; NMIA कडून खंडन!

मुंबई: भारतातील सर्वात मोठ्या परदेशी विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या एमिरेट्स कंपनीने, खानपान आणि मालवाहू गोदाम

Lakme Fashion Week : लडाखच्या 'पश्मिना' आणि पारंपरिक हस्तकलेचा नवी दिल्लीत डंका!

नवी दिल्ली : लडाखचे जगप्रसिद्ध 'पश्मिना' (Pashmina), सुंदर शाली आणि तिथल्या हाताच्या अप्रतिम कलाकुसरीची जादू सध्या

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या