Mulund Road Accident : मुलुंडमध्ये भरधाव किया कारचा भीषण अपघात; भाजी विक्रेत्या महिलेचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

मुलुंड : मुंबईच्या मुलुंड (Mulund) परिसरातून एक धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. मुलुंडमधील सिटी ऑफ जॉय निर्मला सोसायटीजवळ भरधाव वेगाने आलेल्या किया कारने (Kia Car) भाजी विक्रेत्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडच्या सिटी ऑफ जॉय निर्मला सोसायटी परिसरात रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते आपला व्यवसाय करत होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या किया कारने नियंत्रण गमावत थेट भाजीच्या गाडीला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.


या अपघातात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांनाही कारने (Car) जोरदार धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. जखमी व्यक्तींचीही अद्याप ओळख पटलेली नाही. अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघातानंतर किया कारचा चालक (Driver) घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने