CSMT Mega Block : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! CSMT मेगा ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत अनेक एक्स्प्रेस गाड्या दादर - ठाण्यावरच थांबणार

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या पुनर्विकास कामामुळे प्रवाशांचा खोळंबा आणखी काही दिवस कायम राहणार आहे. रेल्वे प्रशासनाने फलाट क्रमांक १६ आणि १७ वरील विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉकचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आता हा मेगा ब्लॉक १३ जूनपर्यंत लागू राहणार आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (CSMT Mega Block)


CSMT स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, त्याचा थेट परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर होत आहे. ब्लॉकमुळे अनेक महत्त्वाच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या मार्गात आणि अंतिम थांब्यात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना अतिरिक्त गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. (CSMT Mega Block)



रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस, बल्लारशाह-सीएसएमटी नंदीग्राम एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस, भुवनेश्वर-सीएसएमटी कोणार्क एक्स्प्रेस, बिदर-सीएसएमटी एक्स्प्रेस, लातूर-सीएसएमटी एक्स्प्रेस आणि मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस या गाड्या आता केवळ दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत. तर मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस ही गाडी ठाणे स्थानकावरच प्रवास समाप्त करणार आहे. (CSMT Mega Block)


याशिवाय, दादर ते CSMT आणि ठाणे ते CSMT या दरम्यान संबंधित गाड्यांची सेवा पूर्णपणे रद्द राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सीएसएमटीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना लोकल रेल्वे किंवा इतर पर्यायी वाहतुकीचा वापर करावा लागणार आहे. (CSMT Mega Block)



दरम्यान, उन्हाळी सुट्ट्यांचा कालावधी संपत असताना आणि प्रवाशांची गर्दी वाढत असताना हा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेकांनी रेल्वेकडून अधिक चांगल्या नियोजनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. (CSMT Mega Block)


तथापि, रेल्वे प्रशासनाने हे काम भविष्यातील सोयीसुविधा आणि स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी अत्यावश्यक असल्याचे सांगितले आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक आणि मार्ग तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. (CSMT Mega Block)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४