Monsoon Alert : येत आहे १०० किमी वेगानं महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

मुंबई : देशासह राज्यात सध्या उष्णतेने अक्षरशः कहर केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून अजून भारताच्या विविध भागांमध्ये पूर्णपणे पसरलेला नसला तरी, अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवामान विभागाने वायव्य भारतात तीव्र चक्रीवादळे, गारपीट आणि मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे.



पुढील ४८ तासांमध्ये देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये अतिवेगवान वादळ येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड या भागांमध्ये ताशी १०० किलोमीटर वेगाने वादळ धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.



हवामान खात्याने काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अजूनही उष्णतेची लाट कायम असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने