Mumbai local : प्रवासी कृपया लक्ष द्या, रविवार ३१ मे रोजी रेल्वेचा मेगाब्लॉक

मुंबई : देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रेल्वे रविवार ३१ मे २०२६ रोजी मेगाब्लॉक घेणार आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक जाणून घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. त्यामुळे रविवारी रेल्वेमार्गे कुठेही फिरायला जाणार असाल तर आधी वेळापत्रक बघून नियोजन करणे हिताचे आहे. यंदाच्या रविवारी म्हणजेच ३१ मे रोजी मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक आहे.

पश्चिम रेल्वे मरिन लाईन्स स्टेशन येथे ३० आणि ३१ मे च्या मध्यरात्री नाईट ब्लॉक घेणार आहे. यामुळे मरिन लाईन्स स्टेशनवरील सर्व रेल्वे मार्गांवर पहाटे १:१५ ते ४:१५ दरम्यान ब्लॉकचा परिणाम दिसेल. विरारहून चर्चगेटला जाणारी शेवटची गाडी VR91012 असेल, जी विरारहून रात्री ११:३० वाजता सुटेल आणि चर्चगेटला पहाटे १:१० वाजता पोहोचेल. चर्चगेटहून सुटणारी पहिली नियोजित जलद गाडी VR90021 असेल, जी पहाटे ४:४० वाजता सुटेल. चर्चगेटहून सुटणारी पहिली नियोजित धीम्या गतीची गाडी BO90025 असेल, जी पहाटे ४:४६ वाजता सुटेल. नाईट ब्लॉक असल्यामुळे पश्चिम रेल्वेवर रविवार ३१ मे रोजी दिवसा रेल्वे वाहतूक खंडित केली जाणार नाही.



 

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवार ३१ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तसेच कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. मेगाब्लॉकच्या कालावधीत मुख्य मार्गावरील विविध सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.

मेगाब्लॉकच्या कालावधीत मुख्य मार्गावरील विविध सेवांवर त्याचा परिणाम होणार आहे. मुख्य मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार दरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ पासून दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सीएसएमटी मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा CSMT आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाउन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील.



हार्बरवर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत आणि पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कुर्ला आणि वाशी – पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांमार्गे प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या कसारा मार्गावर २ ते ५ जून दरम्यान विशेष ब्लॉक आहे. मंगळवार ते शुक्रवार दरम्यान दररोज दुपारी ३:५० ते सायंकाळी ५:५० या वेळेत वाहतूक बंद ठेवण्यात येईल.ब्लॉक कालावधीत कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या अनेक उपनगरीय गाड्या देखील आसनगाव येथेच थांबतील किंवा तेथूनच सुरू होतील. ब्लॉक काळात दुपारी ३:३५ वाजता कसारा येथून सुटणारी गाडी आसनगाव येथून दुपारी ४:१२ वाजता सुटेल तसेच दुपारी ४:१६ वाजता कसारा येथून सुटणारी गाडी आसनगाव येथून दुपारी ४:५४ वाजता सुटेल, या व्यतिरिक्त संध्याकाळी ५:०२ वाजता कसारा येथून सुटणारी गाडी आसनगाव येथून संध्याकाळी ५:३९ वाजता सुटेल.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने