Bhimashankar Temple : भीमाशंकर मंदिराचे काम अद्याप अपूर्ण, दर्शनासाठी १५ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार

पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिराच्या दर्शनासाठी भाविकांची प्रतीक्षा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने मंदिर ३१ मे रोजी भाविकांसाठी खुले करण्याचा मानस व्यक्त केला होता. मात्र, मुख्य मंदिराच्या सभामंडपाचे बांधकाम आणि परिसरातील साफसफाईची कामे अद्याप पूर्ण न झाल्याने हा मुहूर्त हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भीमाशंकर मंदिराचे दरवाजे आता १५ जूननंतरच भाविकांसाठी (Devotees) खुले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरात सुमारे २८८ कोटी रुपयांच्या विकासकामांना वेग देण्यात आला आहे. यामध्ये मुख्य मंदिराच्या (Temple) सभामंडपाची पुनर्बांधणी, परिसर सुशोभीकरण आणि भाविकांसाठी विविध सुविधा उभारण्याची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मंदिराचा मुख्य भाग बंद ठेवण्यात आला असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.



पाच महिन्यांपासून मंदिर दर्शनासाठी बंद


जानेवारी २०२६ (January 2026) पासून भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपाचा जुना भाग काढून त्याठिकाणी नव्याने दगडी बांधकाम करण्यात येत आहे. हे काम अत्यंत बारकाईने आणि पारंपरिक पद्धतीने सुरू असल्याने अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आणि बांधकाम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.


प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच ३१ मेपर्यंत मंदिर खुले करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, काही महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण असल्याने मंदिर (Temple) पुन्हा सुरू होण्यास विलंब होणार असल्याचे चित्र आहे.



स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा फटका


मंदिर केवळ तीन महिन्यांसाठी बंद राहील, अशी माहिती सुरुवातीला देण्यात आली होती. मात्र, आता पाच महिने उलटूनही मंदिर दर्शनासाठी खुले झालेले नाही. त्यामुळे दर्शनासाठी उत्सुक असलेल्या लाखो भाविकांची निराशा होत आहे. यासोबतच स्थानिक व्यावसायिक, हार-फूल विक्रेते, प्रसाद विक्रेते आणि हॉटेल व्यवसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. भाविकांची संख्या घटल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असून अनेक व्यापाऱ्यांचे उत्पन्न कमी झाले आहे. मंदिराचे काम नियोजित वेळेत पूर्ण न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.



मंदिराचे बहुतांश काम पूर्णत्वाच्या मार्गावर


दरम्यान, मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार भीमाशंकर मंदिराच्या पुनर्बांधणीचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. सभामंडपावरील डोमचे काम अंतिम टप्प्यात असून मंदिराकडे जाणारा पायरी मार्ग सुमारे ९० ते ९५ टक्के पूर्ण झाला आहे. तसेच मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक असलेल्या ८७० दगडांपैकी सुमारे २०० दगड बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे.


उर्वरित सर्व कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले असून त्यानंतर भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे लाखो शिवभक्तांचे लक्ष आता मंदिर दर्शन कधी सुरू होणार याकडे लागले आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न