Nashik : जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : दिंडोरी तालुक्यातील जांबुटके (Jabutek) येथे जमिनीच्या वादातून ६५ वर्षीय शेतकऱ्याचा खून करून मृतदेह गोणीत लपवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जांबुटके गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जांबुटके शिवारात योगेश कराटे (३५) व भाऊसाहेब अपसुंदे यांचा रस्त्यावरून वाद होता. त्यामुळे भाऊसाहेब अपसुंदे (६५) यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात (Dindori Police Station) तक्रार दाखल केली होती. त्याचबरोबर योगेश कराटे यांनी सुद्धा गुरुवार (दि. २८) रोजी फिर्याद दाखल केलेली होती. संध्याकाळी दोघे भेटले असता योगेश कराटे यांनी भाऊसाहेब अपसुंदे यांना घरी नेले. तेथे वाद होऊन अपसुंदे यांचा खून केल्याचा संशय कुटुंबियांकडून वर्तवण्यात येत आहे.



दरम्यान, खून केल्यानंतर भाऊसाहेब यांचा मृतदेह गोणीत भरून ठेवला होता. रात्री पोलिसांनी (Police) घटनास्थळी भेट दिली असता मृतदेहा शेजारी पावडे व रक्ताने भरलेला दांडा सापडला. यानंतर मृतदेह (Dead Body) दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात (Dindori Rural Hospital) उत्तरिय तपासणासाठी पाठवण्यात आआला आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Nashik Crime News)


 

पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणावरू ६० वर्षीय महिलेवर हल्ला


दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात किरकोळ कारणावरून ६० वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील ताथवडे परिसरात घरात मांजरी ये-जा करत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ६० वर्षीय महिलेवर हल्ला करण्यात आला. या मारहाणीत संबंधित महिला जखमी झाल्या असून त्यांच्या डोक्यात वीट फेकून मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.



कविता चिंतामणी सोनवणे (वय ६०) या ताथवडे परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेजारी सूर्यवंशी कुटुंब राहते. या कुटुंबाकडे काही मांजरी असून त्या वारंवार सोनवणे यांच्या घरात येत असल्याची तक्रार त्यांनी अनेकदा केली होती. मात्र, या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे. या हल्ल्यात कविता सोनवणे गंभीर जखमी झाल्या. मारहाणीनंतर त्यांनी तातडीने वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलि‍सांनी (Police) संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


दरम्यान, केवळ मांजरी घरात येत असल्याच्या कारणावरून झालेल्या या वादाने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणातून झालेल्या या मारहाणीच्या घटनेची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे

Comments
Add Comment

Mumbai Railway Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असुद्या! रविवारी तीन मार्गिकेवर 'मेगा ब्लॉक'; जाणून घ्या सर्व अपडेट

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवार दिनांक 18 ऑक्टोबर

BMC News : गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी मोठी कारवाई! मुलुंडमध्ये आणखी २१५ बांधकामे हटवली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून उपनगरांतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या

संविधानाची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविणे ही काळाची गरज, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय संविधान हे केवळ एक दस्तऐवज नसून त्यातील तत्वे प्रत्यक्ष जीवनात उतरविणे महत्चसचे

Saudi Arabia Flight Update : सौदी अरेबियासाठी विमानसेवा रद्द! IndiGo आणि Akasa Air चा मोठा निर्णय; प्रवाशांनी लक्ष द्या

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील वाढत्या तणाव आणि सुरक्षा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो आणि अकासा एअर या

Weather Alert: हवामानाचा मोठा इशारा! उद्या 16 राज्यांत पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

देश: हवामान विभागाने पुन्हा एकदा 16 राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17

Palm Jaggery Export : भारताच्या सेंद्रिय पामिरा गुळाची बल्गेरियाला पहिली निर्यात; 1.755 टनांची खेप रवाना

नवी दिल्ली : भारताच्या पारंपरिक आणि पौष्टिक अन्नपदार्थांनी आता जागतिक पातळीवर आपली पाळेमुळे घट्ट करण्यास