Karnataka Crime News: २५ एकर जमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या; खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध निराळे कुटुंबावर काळाचा घाला

विजापूर : जमिनीच्या वादातून नातेसंबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील (Karnataka) विजापूर (Vijapur) जिल्ह्यात घडली आहे. शेतजमिनीच्या वादातून सहा जणांची निर्घृण हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खिल्लार बैलांचे संगोपन करणारे आणि ‘निराळे सावकार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या निराळे कुटुंबातील सदस्य या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील गोविंदपूर गावात ही घटना घडली. गावातील निराळे आणि गोळगी कुटुंबांमध्ये २५ एकर शेतीच्या मालकीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. संबंधित जमीन निराळे कुटुंबीयांनी खरेदी केली होती. मात्र, गोळगी कुटुंबातील एका नातेवाईकाने या व्यवहाराला विरोध दर्शवला होता. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये अनेकदा वाद झाले होते. तरीही निराळे कुटुंबाने जमीन खरेदीचा निर्णय कायम ठेवला होता.



शेतात साफसफाईसाठी गेले आणि झाला हल्ला


मयत रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे आणि शब्बीर अत्तार हे शेतात साफसफाईच्या कामासाठी गेले होते. त्याचवेळी गोळगी कुटुंबातील काही सदस्य घटनास्थळी पोहोचले. दोन्ही गट आमनेसामने आल्यानंतर वाद उफाळून आला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपींनी प्रथम गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर धारदार शस्त्रांनी हल्ला करत सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शेताच्या रस्त्यावर काही फुटांच्या अंतरावर सहा मृतदेह (Dead Bodies)


या हल्ल्यात चडचण नगरपंचायतीचे सदस्य चेतन निराळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू (Death) झाला आहे. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर नदाफ अत्तार आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे शेताच्या रस्त्यावर अवघ्या काही फुटांच्या अंतरावर सहा मृतदेह आढळून आले. मृतांच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार शस्त्रांनी गंभीर वार करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.



पोलिसांची धाव, तपासाला वेग


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अप्पुगौडा आणि त्याच्या साथीदारांनी हा हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. अप्पुगौडा हा भीमा खोऱ्यातील जुन्या खून प्रकरणातील मृत मानकप्पा मास्टरचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात शेतात कामासाठी आलेले मजूर शब्बीर नदाफ यांचाही मृत्यू झाला. विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून चडचण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



खिल्लार बैलांसाठी प्रसिद्ध ‘निराळे सावकार’ कुटुंब


निराळे कुटुंब हे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शेतकऱ्यांमध्ये विशेष ओळख असलेले नाव आहे. खिल्लार जातीच्या बैलांचे संगोपन आणि संवर्धन करण्यासाठी हे कुटुंब प्रसिद्ध आहे. प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या गोठ्यात खिल्लार बैल असावा, अशी इच्छा असते आणि त्यामुळे निराळे कुटुंबाची मोठी प्रतिष्ठा निर्माण झाली होती. चडचण येथील प्रसिद्ध यात्रा सुरू करण्यामागेही निराळे कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगितले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून मोठ्या संख्येने शेतकरी खिल्लार बैल खरेदी करण्यासाठी येत असत. निराळे कुटुंबाची चौथी पिढी आजही या परंपरेचे जतन करत होती. मात्र, जमिनीच्या वादातून झालेल्या या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Pune Crime News : पुण्यातील खराडीत २३ वर्षीय IT इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवलं; प्रियकराला पोलिसांकडून अटक, नेमकं प्रकरण काय ?

पुणे : पुण्यातील खराडी परिसरात एका २३ वर्षीय आयटी इंजिनिअर तरुणीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली

Apple iPhone18 : iPhone 18 Pro, Pro Maxच्या प्री-ऑर्डरला विलंब? १२ सप्टेंबरपासून बुकिंग सुरू होण्याची शक्यता

मुंबई : ॲपलच्या आगामी iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Maxची उत्सुकता वाढली असून, या दोन्ही प्रीमियम मॉडेल्सच्या प्री-ऑर्डरची तारीख

Nashik Crime : समृद्धी महामार्गावरील दरोड्याप्रकरणी सात जण ताब्यात, ५ फरार आरोपींचा शोध सुरू

Nashik Crime : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या

Ambajogai : स्लीपर हातात धरली अन् लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई, रमाबाईंची मॅरेथॉन राज्यात चर्चेत

Ambajogai Marathon : ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक सूट, साधी साडी अन् रोजच्या वापरातली चप्पल एवढंच काय तर त्या माऊलीकडे.

Maharashtra Zilla Parishad Elections : उर्वरित २२ जिल्हा परिषदा राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

- कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा; दिलीप वळसेंकडे नेतृत्व, २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर मुंबई : आगामी

Nashik News : समृध्दी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना, लुटीच्या घटनांनंतर पोलीस सतर्क

Nashik News : मुंबई ते नागपूर या महाराष्ट्रातील दोन महानगरांना जोडणारा समृद्धी महामार्ग मागील आठवड्यात लुटमारीच्या