पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी

आधुनिक व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारण्याचा निर्धार


पाली : राज्यातील एसटी प्रवाशांना अधिक दर्जेदार व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रा.प. पाली बसस्थानकाच्या पुनर्बांधणी प्रकल्पाची परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.पाली येथील बसस्थानकासाठी सुमारे १५ हजार ७५७ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा सन १९७१ मध्ये संपादित करण्यात आली होती. या जागेवर सन १९७८ मध्ये बसस्थानकाची इमारत उभारण्यात आली होती. कालबाह्य झालेली जुनी इमारत सन २०२२ मध्ये पाडण्यात आल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी सज्ज नवीन बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून रु. १३ कोटी ९६ लाख ४४ हजार ३४६ इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.बसस्थानकाच्या जागेवर कोणतेही अतिक्रमण अथवा न्यायप्रविष्ट प्रकरण नसल्याने प्रकल्पाच्या अंमलबजावणीस कोणताही अडथळा नसल्याची माहिती यावेळी देण्यात आली.नवीन बसस्थानकात ८ फलाटांचे सुसज्ज बसस्थानक, प्रशस्त प्रतीक्षालय, स्वतंत्र कँटीन, विद्यार्थी पासधारक व आरक्षणधारकांसाठी विशेष सुविधा, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, चालक-वाहकांसाठी विश्रामगृह, चौकशी कार्यालय, प्रशासकीय कार्यालये, दुकाने, उपहारगृह तसेच इतर विविध प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


लवकरच निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष बांधकाम कार्यास गती देण्यात येणार आहे.यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, “पाली हे महत्त्वाचे धार्मिक व पर्यटन केंद्र असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक आणि प्रवासी येत असतात. त्यामुळे आधुनिक, स्वच्छ व सर्व सुविधांनी युक्त बसस्थानक उभारून प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे स्वरूप प्राप्त होईल आणि प्रवाशांच्या सोयींमध्ये मोठी भर पडेल.”मंत्री प्रताप सरनाईक यांनी लोकांच्या मागणीचे निवेदनावर लगेच कारवाई होण्यासाठी एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांना दूरध्वनी द्वारे संपर्क साधून कल्याण- पाली ही बस लवकर सुरू करण्याची निर्देशित केले. तसेच पाली - खोपोली मार्गावर शटल सेवेच्या फेऱ्या वाढविण्यासाठी नव्या बसेस देण्याची देखील सूचना केल्या.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर