Jacqueline Fernandez : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिस अडचणीत; कोर्टाचे महत्त्वाचे आदेश!

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) हिला २०० कोटी रुपयांच्या कथित फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल, जॅकलिन फर्नांडिस आणि इतर १४ आरोपींविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात जॅकलिनला न्यायालयीन खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.


न्यायालयाने दिलेल्या आदेशात तपास यंत्रणांनी सादर केलेले पुरावे, कागदपत्रे आणि उपलब्ध तथ्यांचा प्राथमिक आढावा घेतल्यानंतर आरोपींविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगमध्ये (Money Laundering) सहभाग असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसा आधार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.



अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) तपासानुसार, सुकेश चंद्रशेखरने तुरुंगात असतानाही फसवणुकीचे मोठे रॅकेट चालवले होते. तो स्वतःला पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय गृह मंत्रालय किंवा इतर वरिष्ठ सरकारी विभागांतील अधिकारी असल्याचे भासवत लोकांची फसवणूक करत होता. बनावट ओळख, खोटे फोन कॉल आणि एन्क्रिप्टेड अॅप्सच्या माध्यमातून त्याने २०० कोटी रुपयांहून अधिक रकमेची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे.


तपासात असेही समोर आले आहे की, या कथित बेकायदेशीर कमाईचा वापर आलिशान मालमत्ता, महागड्या गाड्या आणि लक्झरी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी करण्यात आला. ईडीच्या आरोपपत्रानुसार, सुकेशने जॅकलिन फर्नांडिसला सुमारे ५.७१ कोटी रुपयांच्या महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये दागिने, लक्झरी वस्तू आणि इतर मौल्यवान भेटींचा समावेश होता.



ईडीचा (ED) दावा आहे की, सुकेशचा गुन्हेगारी इतिहास माहिती असूनही जॅकलिनने त्याच्याकडून भेटवस्तू स्वीकारल्या. तसेच चौकशीदरम्यान तिने दिलेल्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याचाही आरोप तपास यंत्रणेने केला आहे. आता न्यायालयाच्या आदेशानंतर या बहुचर्चित प्रकरणातील पुढील सुनावणी आणि न्यायालयीन प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

Comments
Add Comment

Rohit Sharma New Reality Show : क्रिकेटच्या मैदानावर सिक्सर मारणारा हिटमॅन आता टेलिव्हिजनचा TRP वाढवणार, रोहित शर्माचा नवा रिऍलिटी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सर्वांचा लाडका 'हिटमॅन' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटर रोहित शर्मा टीव्हीवर एक नवा रिएलिटी शो घेऊन येत आहे.

Badshah Isha Rikhi Divorce : अवघ्या ५ महिन्यांतच संपलं नातं! प्रसिद्ध गायक बादशाहचा घटस्फोट; सोशल मीडियावरील पोस्टने खळबळ

प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी यांच्या नात्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. लग्नाच्या अवघ्या पाच

Kashmira Irani Pregnancy : अभिनेत्री कश्मिरा इराणीने दिली गुडन्यूज! ४०व्या वर्षी होणार आई; लग्नानंतर दोन वर्षांनी घरात येणार चिमुकला पाहुणा

मुंबई : बॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेत्री कश्मिरा इराणी लवकरच

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या