Sachin Tendulkar : वैभववर दबाव टाकू नका; टीम इंडियातील निवडीवर सचिन तेंडुलकरचे स्पष्ट मत, दिला मोठा सल्ला...

Mumbai : राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आयपीएल 2026 मधील आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे देशभर चर्चेचा विषय झाला आहे. सलग दोन हंगामात दमदार कामगिरी करत त्याने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे आता त्याला लवकरच भारतीय संघात संधी द्यावी, अशी मागणी जोर धरत असताना भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने याबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. सचिनचे विधान सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



नेमकं काय म्हणाला सचिन तेंडुलकर ?


सचिन तेंडुलकरने वैभवच्या नैसर्गिक खेळाचे कौतुक केले. वैभववर अनावश्यक दबाव टाकू नका. तो सध्या जसा खेळतो आहे, तसाच खेळत राहणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या खेळात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. तो स्वतःवर विश्वास ठेवतो आणि मैदानात नेमके काय करायचे हे त्याला चांगलंच माहित आहे; असे सचिनने सांगितले.


डोक्यात खूप गोष्टी भरल्या तर समस्या सुरू होतील...


वैभवच्या स्वभावावर बोलताना सचिनने प्रशिक्षक आणि क्रिकेट तज्ज्ञांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. जर त्याच्या डोक्यात आतापासूनच खूप गोष्टी भरल्या गेल्या आणि सतत सूचना दिल्या गेल्या, तर समस्या निर्माण होईल. त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्यावा. सचिनने पुढे सांगितले की वैभवकडे केवळ ताकदीने फटके मारण्याची क्षमता नाही, तर मनगटाच्या जोरावर चेंडूला दिशा देण्याचीही कला आहे. चेंडूचा टप्पा आणि दिशा तो अतिशय लवकर ओळखतो, ही त्याची मोठी ताकद आहे, असं सचिनने सांगितले.





टीम इंडियातील संधी बाबत काय म्हणाले ?


वैभवला भारतीय संघात तातडीने स्थान द्यावे का, या प्रश्नावर सचिनने मध्यम भूमिका घेतली. मी निवड समितीचा सदस्य नाही आहे. त्यामुळे त्याच्या निवडीबद्दल थेट भाष्य करणे मला योग्य वाटत नाही. मात्र. प्रत्येक क्रिकेटप्रेमीप्रमाणे मला ही वाटते की तो देशासाठी खेळावा...सचिनने शेवटी वैभवसारख्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा प्रतिभेला योग्य पाठिंबा मिळायला हवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या क्रिकेटचा आनंद घ्या त्याच्यावर अपेक्षांचा दबाव टाकू नका.

आयपीएलमध्ये वैभवची दमदार कामगिरी


यंदाच्या हंगामात वैभवने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्षय वेधून घेतले आहे. अवघ्या 15 व्या वर्षी आयपीएलमध्ये गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत वैभव सूर्यवंशीने अनेक दिग्गजांचे विक्रम मोडले आहेत. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे तो भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानला जात आहे. मात्र, सचिनच्या मते त्याच्या यशाचा खरा मंत्र म्हणजे त्याचा नैसर्गिक खेळ आहे. त्याच्यावर अपेक्षांचा दबाव टाकू नका असं सचिन यावेळी म्हणाला.

Comments
Add Comment

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

BGMI खेळताना मोबाईल हँग होतोय? आता टेन्शन विसरा! भारतात लवकरच येतोय BGMI Air; प्री रजिस्ट्रेशनला सुरुवात

भारतात BGMI या गेमचे तरुणांमध्ये प्रचंड वेड आहे. २०२१ मध्ये जेव्हा हा गेम लाँच झाला अगदी तेव्हापासून

Kylian Mbappe : मेस्सीचा विक्रम मोडला! चॅम्पियन्स लीगमध्ये 100 सामने खेळणारा सर्वात तरुण खेळाडू

Kylian Mbappe : फुटबॉल विश्वातून एक अत्यंत रोमांचक आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. रिअल मद्रिदचा स्टार फॉरवर्ड किलियन

IND vs WI: हैदराबाद टी20 पराभवातून टीम इंडियाने घेतला धडा, पुढचा सामना कसा जिंकणार ते श्रेयस अय्यरने सांगितलं

भारतीय संघाला टी20 मालिकेतील वेस्ट इंडिजविरुद्धचा पेपर थोडा कठीण गेला आहे. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात सामना पराभवाचा वेग काही भलताच, आतापर्यंत सर्व भारतीय कर्णधारांना टाकलं मागे

[caption id="attachment_1066530" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका विजयाचं गणित