Railway : धावत्या रेल्वेत महिलेची प्रसूती, मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांची तत्परता

भुसावळ : मानवी संवेदनशीलता, तत्परता आणि सेवेची भावना जपत मध्य रेल्वेच्या रनिंग स्टाफने धावत्या रेल्वेत एका महिलेची सुरक्षित प्रसूती घडवून आणत आई आणि बाळाचे प्राण वाचवले. गाडी क्रमांक १५९४५ लोकमान्य टिळक टर्मिनस-दिब्रुगड एक्स्प्रेसमध्ये भुसावळ आणि इटारसी दरम्यान हा प्रसंग घडला.




रेल्वेत प्रवास करणारे रवी चौधरी यांनी पत्नी ज्योती चौधरी यांना अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती कंडक्टर एस. पी. फिरके आणि तिकीट तपासनीस अंबरीश कुमार तिवारी यांना दिली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. बी-६ डब्याच्या गॅलरीत ब्लँकेट व चादरींच्या साहाय्याने स्वच्छ आणि सुरक्षित जागा तयार करण्यात आली. तसेच महिलेला आवश्यक ती मदत व काळजी देण्यात आली. दरम्यान, भोपाळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून हरदा स्थानकावर डॉक्टर व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.



रेल्वेतील महिला प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ज्योती चौधरी यांनी धावत्या रेल्वेतच एका निरोगी मुलाला जन्म दिला. नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच डब्यातील प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. रेल्वे हरदा स्थानकावर पोहोचताच रेल्वे सुरक्षा दल, महिला कॉन्स्टेबल आणि पॅरामेडिक्सची टीम मदतीसाठी सज्ज होती. आई आणि बाळाला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. या घटनेमुळे भारतीय रेल्वे ही संकटावेळी मदतीला धावून येणारी जीवनवाहिनी असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि