Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि समन्वयित तपासामुळे चिमुकलीला सुखरूपपणे तिच्या कुटुंबीयांकडे परत आणण्यात आले. या कारवाईमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. (Missing Girl News)






मिळालेल्या माहितीनुसार, दिवा परिसरातील एक ७ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली.

या प्रकरणात दिवा आणि मुंब्रा पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे काम केले. पोलिसांनी या प्रकरणी सात पथकांची नेमणूक केली. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तसेच तांत्रिक माहिती आणि स्थानिक सूत्रांच्या मदतीने मुलीचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. अनेक ठिकाणी चौकशी करून पोलिसांनी शोधमोहीम वेगाने पुढे नेली.

अखेर सलग प्रयत्नांनंतर ३६ तासांच्या आत बेपत्ता मुलीचा शोध लागला. बदलापूर येथून मुलीला पोलिसांनी सुरक्षितपणे ताब्यात घेतले. पोलिसांनी तिला तिच्या पालकांकडे सोपवले. मुलगी सुखरूप असल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

या यशस्वी कारवाईबद्दल ठाणे पोलीस प्रशासनाने संबंधित पथकाचे कौतुक केले आहे. हरवलेल्या मुलांशी संबंधित प्रकरणांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आणि अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई केली जाते, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. वेळेत केलेल्या शोधकार्यामुळे एका कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

 





Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी