Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या २६४० घरांसाठी तब्बल ९७ हजारांहून अधिक अर्ज; मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद

मुंबई :  शहरातील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या २६४० घरांच्या सोडतीला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज प्रक्रियेसाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी घरांसाठी अर्ज दाखल केले. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समोर आलेल्या आकडेवारीनुसार, २६४० सदनिकांसाठी एकूण ९७,६१३ अर्ज प्राप्त झाले आहेत. (Mumbai Mhada Lottery)

 

म्हाडाने यावर्षी विविध उत्पन्न गटांसाठी मुंबईतील अनेक भागांमध्ये घरांची सोडत जाहीर केली होती. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ मे होती, तर अनामत रक्कम भरण्यासाठी २९ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ७५,३६६ अर्जदारांनी अनामत रक्कमही जमा केली आहे.



यंदाच्या सोडतीत विक्रोळी, गोरेगाव, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, दादर आणि माझगावसह विविध भागांतील घरांचा समावेश करण्यात आला आहे. अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ घरे, अल्प उत्पन्न गटासाठी ८५८ घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ घरे आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

म्हाडाकडून अर्जांची प्रारूप यादी १० जून रोजी दुपारी ३ वाजता अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर अर्जदारांना १२ जूनपर्यंत ऑनलाइन दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी मिळणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १६ जून रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.

दरम्यान, २०२४ च्या तुलनेत यंदाच्या सोडतीला अर्जदारांचा प्रतिसाद काहीसा कमी असल्याचे दिसून येत असले, तरीही हजारो नागरिकांनी स्वतःच्या घराच्या आशेने अर्ज दाखल केले आहेत. आता सर्वांचे लक्ष म्हाडाच्या संगणकीय सोडतीकडे लागले आहे.
Comments
Add Comment

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी

Logistics Park Subsidy Maharashtra : लॉजिस्टिक पार्कना २० टक्क्यांपर्यंत भांडवली अनुदान राज्य सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई : राज्यातील लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी क्षेत्रातील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने लॉजिस्टिक