NCP : पुण्यात विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार?

पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर निर्णय


मुंबई : विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. रविवारी रात्री तब्बल पाच तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीतील अनेक बडे नेते या जागेसाठी इच्छुक असताना आणि भाजपकडूनही या जागेसाठी जोरदार फिल्डिंग लावली गेली असताना, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'ग्रीन सिग्नल'नंतर काकडे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.


पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रविवारी रात्री ८.३० वाजता सुरू झालेली ही महत्त्वाची बैठक मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकीला खासदार संजय काकडे हेदेखील प्रामुख्याने उपस्थित होते. पुणे विधानपरिषदेची जागा आपल्याच पक्षाकडे राहावी, यासाठी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रचंड आग्रही होते. या जागेवरून महायुतीत मोठा पेच निर्माण झाला होता; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोननंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार हे स्पष्ट झाले आणि त्यानंतर पाच तासांच्या खलबतांनंतर विक्रम काकडे यांच्या नावावर अंतिम मंजुरी देण्यात आली.



यापूर्वी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून माजी आमदार सुनील टिंगरे यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. महायुतीत ठरलेल्या फॉर्म्युलानुसार टिंगरे यांचे नाव आघाडीवर होते; मात्र ऐनवेळी सुनेत्रा पवार यांनी विक्रम काकडे यांच्या नावावर विश्वास दाखवत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला. विक्रम हे युवा नेते पार्थ पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.


पुण्यात पुन्हा 'राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी' सामना

दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आधीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा 'राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी' असा सामना पाहायला मिळणार आहे. महायुतीकडून विक्रम काकडे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर आता शरद पवार गटाचे श्रीकांत पाटील आपली उमेदवारी मागे घेणार की लढत कायम राहणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने दोन्ही बाजूंनी बंडखोरांना शांत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.



कोण आहेत विक्रम काकडे?

- पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित झालेले विक्रम काकडे हे भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत. राजकारणात ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांचे अत्यंत जवळचे संबंध मानले जातात. व्यावसायिक पातळीवर त्यांनी पुण्यातील एक नामांकित आणि यशस्वी बांधकाम व्यावसायिक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.


- क्रीडा क्षेत्रातही विक्रम काकडे यांनी मोठी कामगिरी बजावली आहे. ते सलग ४ वर्षे 'स्टेट शूटिंग चॅम्पियन' (राज्यस्तरीय नेमबाजी विजेते) राहिले असून, त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील संघातही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा झेंडा फडकवत त्यांनी इटली, फ्रान्स, जर्मनी आणि थायलंड येथील प्रतिष्ठित 'थाय ओपन' नेमबाजी स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण