BMC : प्रत्येक सोसायट्यांच्या आवारात एक झाड लावा

महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी केले आवाहन


मुंबई : मुंबईतील कोस्टल रोड प्रकल्पांमध्ये सुमारे १२०० झाडे बाधित होणार असून यासाठी आता मुंबईत अधिकाधिक वृक्षारोपण करण्यासाठी ५५ हजार झाडांचे रोपण करण्याची सूचना भाजपने मांडली आहे. त्यामुळे प्रत्येक सोसायटींमध्ये एक झाड लावण्याचे आवाहन महापालिका सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले आहे.

कोस्टल रोडअंतर्गत बाधित होणाऱ्या १२०० झाडांच्या बदल्यात वृक्षरोपण करण्यासाठी पवई व पनवेल येथे ३५ एकर जागा उपलब्ध होणार असून त्याठिकाणी पर्यायी वृक्षरोपण केले जाणार आहे. परंतु मुंबईत ४५ हजार गृहनिर्माण सोसायटी असून १० हजार भाडेतत्वावरील मालमत्ता आहेत. या ५५ हजार सोसायट्यांच्या आवारात प्रत्येकाने एक झाड लावले पाहिजे. तसेच वर्षभरात एकदा झाडांचे ऑडीट करण्यात यावे आणि पावसाळ्यात आवारात एक तरी झाड लावलेच पाहिजे,असे खणकर यांनी स्पष्ट केले.



पदपथावर फेरीवाला नाही तर माफिया बसलेत

मुंबईतील फेरीवाल्यांविरोधात घेतलेल्या कारवाईचे समर्थन करताना जे परंपरागत एकच वस्तू एकाच जागेवर बसून विक्री करतात अशा फेरीवाल्यांच्या विरोधात आम्ही नाही आहोत. पण एकाच जागेवर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या वस्तू आणि माणसे बदलली जातात, त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. जे रस्ते अडवून आणि रेल्वे स्थानक परिसर अडवून बसले आहेत त्यांच्या विरोधात आम्ही आहोत. त्यामुळे हे रस्ते आणि रेल्वे स्थानक परिसर अडवून कोण बसले आहेत, हे प्रत्येकाने पाहावे आणि जिथे जिथे ही कारवाई केली जात आहे, तिथे स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करताना दिसत आहे,असे खणकर यांनी सांगून ही कारवाई पुढेही तीव्र केली जाईल,असे स्पष्ट केले. जे पोट भरण्यासाठी इथे आले आहे त्यांच्यावर अन्याय होवू देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रस्ते अडवून बसले आहेत, त्यांना हुसकावून लावलेच जाईल,असेही त्यांनी सांगितले.



यापूर्वी महापालिकेला गृहनिर्माण सोसायट्यांनी दिला होता अल्प प्रतिसाद

मुंबई महापालिकेच्यावतीने सन २०१६ -१७च्या मुंबईत सुमारे १० हजार झाडे लावण्याचा संकल्प करत गृहनिर्माण संस्थांना आवाहन करण्यात आले होते. परंतु, महापालिकेच्या आवाहनानंतर एकाही संस्थेकडून अर्ज प्राप्त झाला नव्हता. गृहनिर्माण संस्थांना केवळ आपल्या इमारतीच्या आवारात जागा उपलब्ध करून द्यायची होती आणि महापालिकेच्यावतीने झाडे उपलब्ध करून तिथे वृक्षारोपण करण्यात येणार होते. परंतु तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांच्या आवाहनानंतर कोणताही प्रतिसाद लाभला नव्हता, त्यामुळे आता सभागृहनेत्यांचा आवाहनानंतर किती प्रतिसाद लाभतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कांजूर मार्ग डम्पिंग ग्राऊंड परिसरात ५ हजार झाडे लावणार

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडबाबत न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रीन फेन्सिंंग तयार करण्यात येणार असून त्यासाठी अधिकाधिक झाडे लावण्यात येणार आहे. त्यानुसार या परिसरात आता ५ हजार झाडे लावली जाणार असून येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून या वृक्षारोपणाचा शुभारंभ केला जाणार आहे.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने