Bomb Threat : अहमदाबादमध्ये खळबळ! स्पोर्ट्स क्लब उडवण्याची धमकी; पत्रात दाऊद आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख

अहमदाबाद: गुजरातची राजधानी अहमदाबादमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. अहमदाबादच्या प्रसिद्ध स्पोर्टस क्लबला बॉम्बने उडवण्याच्या धमकी आली आहे. या धमकीमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पोर्ट्स क्लबला बॉम्बस्फोटाची धमकी देणारे पत्र सापडल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. विशेष म्हणजे या पत्रात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख आहे त्यामुळे हा प्रकार जास्त चर्चेत आहे.


एसपी स्टेडियमजवळील स्पोर्ट्स क्लबमधील एका खोलीची साफसफाई सुरू होती. तेव्हा एका कर्मचाऱ्याला कपाटातून एक संशयास्पद चिठ्ठी सापडली. या पत्रात 21 जून रोजी क्लबमध्ये स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती. धक्कादायक बाब म्हणजे ज्या खोलीत चिठ्ठी सापडली त्यात परदेशी नागरीक राहत होते. खोलीत टांझानियाचे तीन व्यापारी वास्तव्यास होते. त्यांनी 30 मे रोजी खोली रिकामी केली होती. सध्या तिघेही भारतात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे. या धमकीची माहिती मिळताच, बॉम्ब स्क्वॉड, डॉग स्क्वॉड, एसओजी आणि स्थानिक पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली. जवळपास दोन तास सखोल तपासणी करण्यात आली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही. पोलीस प्रशासन हाय अलर्ट मोडवर आहे. सतत पोलीस फेऱ्या आणि नाकाबंदी केली जात आहे.


दाऊद आणि लष्करचा उल्लेख; तपासाची दिशा बदलली


पत्रात दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तोयबाचा उल्लेख असल्याने तपास यंत्रणांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले आहे. चिठ्ठी नेमकी कोणी लिहिली, ती खोलीत कशी आली आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध सुरू आहे. डीसीपी हर्षद पटेल यांनी सांगितले की, संबंधित व्यापारी एका ओळखीच्या व्यक्तीच्या रेफरन्सने क्लबमध्ये थांबले होते. त्या व्यक्तीची चौकशी सुरू असून पत्रामागील सत्य लवकरच समोर येईल.


देशभरात धमकीच्या घटनांमुळे चिंता


चंदीगडमधील काही नामांकीत शाळांनाही ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील या घटनेकडेही अत्यंत गंभीरतेने पाहिले जात आहे.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि