Nashik Rain Update : नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

Nashik Rain Update : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने ( Indian Meteorological Department ) आज मोठा अलर्ट जारी केला होता. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार नाशिकमध्ये पावसाने आज हजेरी लावली.


नाशिकमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. आज मंगळवारी (दि.२) वादळी वाऱ्यासह नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.



नाशिकच्या शालीमार, पंचवटी, सिडको, गंगापूर रोड, सातपूर, जुने नाशिक या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह काही काळ आलेल्या पावसाच्या जोरदार सरींनी एकच धावपळ उडाल्याचे चित्र काही ठिकाणी पहायला मिळाले. अचानक आलेल्या या सरींनी उघडयावर विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांची मात्र आपला माल सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र शहराच्या विविध भागात पहायला मिळाले.


गेल्या काही दिवसांपासून शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले होते. कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत होते. अशा वातावरणात मंगळवारी दुपारनंतर अचानक आकाशात ढग जमा झाले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना (Citizen) दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांना लंडनच्या प्रतिष्ठित ‘Wildlife Photographer of the Year’ पुरस्काराने सन्मानित

बदलापूर : वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात भारताची आणि महाराष्ट्राची मान उंचावणारी एक अभिमानाची बातमी समोर

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

‘रामायणम्’चा इंटरनॅशनल ट्रेलर प्रदर्शित; रणबीर कपूर आणि यशचे सोलो पोस्टर्स जारी

बहुप्रतिक्षित आण