Drain Cleaning BMC News : मानखुर्द, गोवंडी,चेंबूर भागातील नालेसफाईवर महापौरांचे विशेष लक्ष

- गाळ उपसा, नालेस्वच्छता कामांची केली पाहणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईत पावसाळ्यादरम्यान पाणी साचण्याच्या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने सर्वंकष आणि प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. विशेषतः परिमंडळ ५ मधील विविध नाले, कल्व्हर्ट मधील गाळ उपशाची कामे तसेच जलनिसारण व्यवस्थेची कामे अधिक वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल तर विशेष बाब म्हणून अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दिले. पावसाचे पाणी साचण्याची शक्यता असलेल्या सखल भागांचा आढावा घेऊन तेथील उदंचन पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवावेत, जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्‍यावी, असे निर्देशदेखील महापौर तावडे यांनी दिले. (Drain Cleaning BMC News)


महापौर रितू तावडे यांनी विविध ठिकाणी नाल्यांमधून गाळ उपसा कामांची पाहणी केली. यामध्ये घाटकोपर (पूर्व) येथील जय अंबे नगर येथे सोमय्या नाला, गोवंडी येथील घाटकोपर - मानखुर्द जोड मार्गावरील सुभाष नगर नाला, चेंबूरच्या पूर्व मुक्त मार्गाजवळील वाशी नाका नाला, जिजामाता नगर कल्‍व्‍हर्ट, चेंबूर येथील आर. सी. मार्गाजवळील नाला, अयोध्या नगर येथील मानसिंह विजय सोसायटीजवळील नाला या ठिकाणांना सोमवारी १ जून २०२६ रोजी सकाळी प्रत्‍यक्ष भेट देऊन गाळ उपसा कामांची पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले. (Drain Cleaning BMC News)



स्‍थानिक नगरसेवक महादेव शिवगण, स्‍थानिक नगरसेविका प्रज्ञा सदाफुले, उपायुक्त (परिमंडळ ५) संध्या नांदेडकर, एम पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले, उपप्रमुख अभियंता (पर्जन्‍य जलवाहिन्‍या) संजय इंगळे यांच्‍यासह संबंधित अधिकारी या दौऱ्यास उपस्थित होते. वाशी नाका नाल्‍याची पाहणी करताना तरंगता कचरा अडविण्‍यासाठी वापरात असलेले ट्रॅश बूम, कन्‍व्‍हेयर बेल्‍ट यासह उपयोगात येणारे संयंत्र कसे प्रभावीपणे हाताळले जाते, त्याचीही माहिती महापौरांनी घेतली. (Drain Cleaning BMC News)


परिमंडळ ५ मध्ये नालेस्‍वच्‍छता कामे कंत्राटदार नियुक्तीमधील अडचणीमुळे संथ गतीने सुरू होती. प्रारंभी नियुक्त कंत्राटदाराकडून अपेक्षित गतीने काम पूर्ण न झाल्याने त्याच्या जागी नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी लागली. परिणामी, कालापव्‍यय झाला. तरीही, आता नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामांना वेग आल्‍याचे पाहणीदरम्‍यान आढळून आले आहे. यंदा पावसाचे आगमन निर्धारित वेळेनंतर होणार असल्‍याने जूनच्‍या पहिल्या आठवड्यातही नाल्यांमधील गाळ तसेच तरंगता कचरा काढण्याची कामे सुरू ठेवावीत. गाळ काढण्‍याची कार्यवाही अधिक वेगाने करण्यासाठी परिमंडळ ५ मध्‍ये आवश्यकता असेल तर विशेष बाब म्‍हणून अतिरिक्‍त मनुष्‍यबळ आणि यंत्रसामग्री तैनात करावी, असे स्पष्ट निर्देश महापौर तावडे यांनी दिले. (Drain Cleaning BMC News)



महापौर तावडे पुढे म्‍हणाल्‍या की, आवश्यक त्या ठिकाणी नाल्यांना संरक्षक भिंत उभारून सुरक्षितता द्यावी आणि दीर्घकालीन उपाययोजना निश्चित करावी. भूमिगत नाले, मोऱ्या यांची नियमित स्‍वच्‍छता करावी, सांडपाणी वहन प्रक्रिया सुलभ व्‍हावी यासाठी आवश्‍यक त्‍या ठिकाणी रोबोटिक यंत्रणेचा वापर करावा. जलनिसारण व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि जबाबदारीने काम करावे. पावसाचे पाणी साचणा-या सखल भागांमध्ये उदंचन पंप लावावेत. नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांनादेखील नाल्‍यातून गाळ काढण्‍याच्‍या कामांची इत्‍यंभूत माहिती उपलब्‍ध करून द्यावी, असेही महापौर तावडे यांनी स्‍पष्‍ट केले. गाळ काढलेल्‍या नाल्‍यांत नागरिकांनी कचरा आणि राडारोडा टाकू नये, महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करावे, असे नम्र आवाहन देखील महापौर तावडे यांनी यावेळी केले. (Drain Cleaning BMC News)

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने