रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा



















छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनानिमित्त दुर्गराज रायगडावर ५ आणि ६ जून रोजी भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आहे आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्यानिमित्त प्रशासन सज्ज झाले आहे.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती, संयोगिताराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे नियोजन करण्यात आले असून अनेक स्वयंसेवक आणि समित्यांचा यात सहभाग आहे.

या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड परिसरात विशेष तयारी करण्यात आली आहे. गडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सेवा, सुरक्षा यंत्रणा तसेच मार्गदर्शन केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गडावर होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व तयारी पूर्णत्वाकडे नेली आहे.

पहिल्या दिवशी ५ जून रोजी पाचाड येथील राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रायगड चढाई, गडपूजन, पारंपरिक युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी कार्यक्रम, गोंधळ आणि भजन-कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दुसऱ्या दिवशी ६ जून रोजी मुख्य राज्याभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. ध्वजारोहण, शिवछत्रपतींच्या पालखीचे आगमन, उत्सवमूर्तीचा अभिषेक, सुवर्णमुद्रांचा अभिषेक आणि पालखी सोहळा हे कार्यक्रम यावेळी पार पडतील. तसेच शिवभक्तांना संबोधित करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी अभिवादन करून सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे. स्वराज्याच्या इतिहासाला उजाळा देणारा हा सोहळा यंदाही महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

 










Comments
Add Comment

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी