Chief Minister Devendra Fadnavis : राज्याचे ‘क्वांटम व ‘डीप टेक’धोरण लवकरच आणण्यात येणार

मुंबई: महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.राज्याच्या पहिल्या ‘महाराष्ट्र क्वांटम धोरण’ आणि ‘महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली असून संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार ठरणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. आगामी मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही धोरणांना अंतिम मंजुरी दिली जाणार आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. या दोन्ही धोरणांच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रात उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक, संशोधन, नवोन्मेष आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.

Comments
Add Comment

Eknath Shinde : आम्ही दुसऱ्या पक्षात गेलो नाही, आम्ही शिवसेनेतच आहोत; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबठा गटावर घणाघात

दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना उबाठा

Dadaji Bhuse : शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘चला शाळेत जाऊया’ अभियान; मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा

शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये काढणार चार दिवसांचा दौरा मुंबई : राज्यातील शाळांमधील मूलभूत

Shiv Sena party constitution : २०१८ च्या पक्षघटनेने शिवसेनेतील अधिकार एका व्यक्तीकडे केंद्रीत केले; सर्वोच्च न्यायालयात नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद

४३ मान्यताप्राप्त पक्षांपैकी ४२ पक्षांत संघटनात्मक निवडणुका शिवसेना होती एकमेव अपवाद होती निवडणूक आयोगाच्या

jaykumar gore : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक; मागण्या मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका

मुंबई : ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामसेवकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात आज बैठक घेऊन संबंधित मागण्यांचा

Mangal Prabhat Lodha : इस्रायलमध्ये रोजगारासाठी महाराष्ट्रातील ६० बांधकाम कामगारांची पहिली तुकडी होणार रवाना

• कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा इस्रायलमध्ये रोजगारासाठी जाणाऱ्या युवकांशी संवाद मुंबई :

Mangal Prabhat Lodha : शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी एक महापालिका शाळा दत्तक घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे; मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई : शिक्षण क्षेत्रातील नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी आपल्या परिसरातील किमान एका महापालिका