Ind vs Nz Schedule : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! असा असेल भारतीय संघाचा न्युझीलंड दौरा

मुंबई : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने भारताच्या आगामी न्यूझीलंड दौऱ्याचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. तब्बल 5 टी-20, 5 वनडे आणि 2 कसोटी सामने अशा 12 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.



12 सामन्यांची ऐतिहासिक मालिका


ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध न्युझीलंड मालिकेत तब्बल १२ सामने खेळले जाणार आहेत. सात वर्षांत पिहल्यांदा भारत एका दौऱ्यात येवढे सामने खेळणार आहे. त्यामुळे ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.या दौऱ्याची सुरुवात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेपासुन होणार आहे. भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून आपल्या दौऱ्याची सुरुवात करणार आहे. ख्राईस्टचर्चच्या हॅगली ओव्हल मैदानावर पहिला टी-20 सामना रंगणार असून, त्यानंतर दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. न्युझीलंडमध्ये भारत आणि न्युझीलंडमधील पहिल्यांदा पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणारा आहे.


टी-२० मालिकानंतर वनडे मालिका


टी-20 मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. आगामी आयसीसी स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची मानली जात आहे. वनडे मालिकेची सुरुवात चार नोव्हेंबरपासून होणार आहे. तर अखेरचा सामना नोव्हेंबर १५ ला खेळला जाणार आहे.


कसोटी मालिकेवर सर्वांचे लक्ष्य


दौऱ्यातील पहिला कसोटी सामना 19 नोव्हेंबरपासून वेलिंग्टनच्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळवला जाईल. तर दुसरी आणि अंतिम कसोटी 27 नोव्हेंबरपासून ख्राईस्टचर्च येथे रंगणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) दृष्टीने ही मालिका निर्णायक ठरू शकते. भारतीय संघ सध्या 52 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.





भारत विरुद्ध न्यूझीलंड संपूर्ण वेळापत्रक


टी-20 मालिका


22 ऑक्टोबर – पहिला टी-20, ख्राईस्टचर्च


24 ऑक्टोबर – दुसरा टी-20, ख्राईस्टचर्च


26 ऑक्टोबर – तिसरा टी-20, ऑकलंड


29 ऑक्टोबर – चौथी टी-20, हॅमिल्टन


31 ऑक्टोबर – पाचवा टी-20, टौरंगा


वनडे मालिका


2 नोव्हेंबर – पहिला वनडे सामना


5 नोव्हेंबर – दुसरा वनडे सामना


8 नोव्हेंबर – तिसरा वनडे सामना


11 नोव्हेंबर – चौथा वनडे सामना


14 नोव्हेंबर – पाचवा वनडे सामना


कसोटी मालिका


19 ते 23 नोव्हेंबर – पहिली कसोटी, वेलिंग्टन


27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर – दुसरी कसोटी, ख्राईस्टचर्च


तिकिटांसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता


भारताच्या सामन्यांना मोठी गर्दी होण्याची शक्यता मानली जात आहे. यामुळे न्यूझीलंड क्रिकेटने चाहत्यांसाठी ऑगस्ट महिन्यापासून प्री-सेल नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विराट कोहली, शुभमन गिल, यशस्वी जैयस्वाल आणि इतर स्टार खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये आतापासूनच उत्साह दिसून येत आहे.

Comments
Add Comment

IND vs ZIM Women T20 : स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखाली भारताची विजयी सलामी; झिम्बाब्वेवर 4 विकेट्सने मात!

भारत विरुद्ध झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघांमधील पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवला. कर्णधार

IND vsNZ : न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या वनडे आणि कसोटी संघाची घोषणा; गिल, अय्यरकडे नेतृत्व

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय पुरुष संघाच्या वनडे आणि कसोटी मालिकेतील संघांची

'घटस्फोटानंतर गोष्टी प्रमाणाबाहेर गेल्या...', युजवेंद्र चहलने दारूच्या व्यसनावर धक्कादायक खुलासा!

भारतीय संघाचा फिरकीपटू गेल्या काही वर्षांपासून वैयक्तिक आयुष्याबाबत चर्चेत आहे. काही ना काही त्याच्या

INDW vs ZIMW: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, कर्णधार स्मृती मंधानाने गोलंदाजी निवडत म्हणाली..

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना होत आहे. कर्णधार स्मृती मंधानाने पूर्णवेळ कर्णधारपदाची

Jai Meena Asian Games : "पंतप्रधानांनी पाठ थोपटत म्हटलं, 'धन्यवाद आपका'..."; आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचणाऱ्या जय मीनाच्या खास आठवणी!

जपानमधील आयची-नागोया येथे पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये (Aichi-Nagoya Asian Games 2026) भारताचा प्रतिभावान खेळाडू

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने हुकमी एक्का काढला, झालं असं की..

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटच्या सामन्यापूर्वी टीम इंडियात एक बदल करण्यात