Karnataka CM D K Shivakumar : कर्नाटकमध्ये आता डीके सरकार, नव्या सरकारचा शपथविधी

बंगळुरू : कर्नाटकमध्ये डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वात नव्या सरकारचा शपथविधी झाला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्रि‍पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर राज्यपालांनी डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बंगळुरू येथील लोकभवनात संध्याकाळी शपथविधीचा सोहळा झाला.



कर्नाटकमधील डी. के. शिवकुमार यांच्या सरकारमध्ये वोक्कालिगा, दलित, लिंगायत, मुस्लिम, ख्रिश्चन, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांना प्रतिनिधित्व देत सामाजिक संतुलन साधल्याचे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार स्वतः वोक्कालिगा समुदायाचे आहेत, तर उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर हे दलित आहेत; ही माहिती पण काँग्रेसकडून देण्यात आली.



डॉ. जी. परमेश्वरा यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. ते राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, एमबी पाटील, रामलिंगा रेड्डी, सतीश जारकीहोली, कृष्णा बायरे गौडा, प्रियांक खर्गे, यूटी खादर, ईश्वर खांद्रे, यतींद्रामा पाटील आणि सुदरेश पाटील यांनीही कर्नाटक सरकारमध्ये मंत्रि‍पदाची शपथ घेतली.



याआधी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी वाढू लागल्याचे पाहून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला. यानंतर सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार आणि कर्नाटक काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांनी दिल्लीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेअंती डी. के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. पक्ष नेत्यांचे आदेश आल्यानंतर कर्नाटक काँग्रेसच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीत एकमत झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांची विधिमंडळनेतेपदी एकमताने निवड झाली. नंतर शिवकुमार यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी शिवकुमार यांना बुधवार ३ जून २०२६ रोजी संध्याकाळी शपथविधी देणार असल्याचे प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर केले. यानंतर जाहीर केलेल्या सरकारी कार्यक्रमानुसार डी. के. शिवकुमार यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.


देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री


काँग्रेसचे डी. के. शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार त्यांच्याकडे एकूण एक हजार ४१३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मुख्यमंत्री म्हणून आंध्र प्रदेशच्या एन. चंद्राबाबू नायडू यांचे नाव येते, त्यांच्याकडे ९३१ कोटी रुपयांची संपत्ती आहे. श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर टीव्हीकेचे संस्थापक अध्यक्ष आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आहेत, त्यांच्याकडे ६४८ कोटी रुपयांची संपत्ती आहे.


उत्तम व्यावसायिक डी. के. शिवकुमार


डी. के. शिवकुमार हे १९८९ पासून सलग आठ वेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत. कर्नाटकमधील कनकपुरा मतदारसंघावर त्यांची उत्तम पकड आहे. कनकपुराचे रॉकस्टार किंवा कनकपुरा बांदा या नावांनीही ते ओळखले जातात. राजकारणी असण्याव्यतिरिक्त ते उत्तम व्यावसायिक आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाचे संकटमोचक असेही म्हणतात.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर