New MIDC : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत नवी एमआयडीसी; मावळ तालुक्यात १,१०० एकरांवर औद्योगिक प्रकल्प

















पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी मावळ तालुक्यात नव्या एमआयडीसीची (MIDC) उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी बऊर, करंज आणि ब्राह्मणवाडी परिसरातील सुमारे १,१०० एकर जमीन निश्चित करण्यात आली असून सर्वेक्षण आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता भूसंपादनाच्या कामालाही सुरुवात झाली आहे

या नव्या औद्योगिक क्षेत्रामुळे परिसरातील रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार असून औद्योगिक गुंतवणुकीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. द्रुतगती मार्गालगत असलेल्या कोरडवाहू जमिनींची निवड या प्रकल्पासाठी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही एमआयडीसी द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना विकसित केली जाणार आहे.





उद्योग विभागाने २००७ मध्ये बऊर एमआयडीसीसाठी क्षेत्र अधिसूचित केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये या परिसरातील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आले होते. आता प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसी प्रशासनाकडून भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवले जात आहेत.


प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रामध्ये बऊर आणि करंज येथील सुमारे ५०० एकर, तर ब्राह्मणवाडी येथील सुमारे ६०० एकर जमिनीचा समावेश आहे. प्राथमिक स्तरावर जमिनीची किंमत प्रतिएकर सुमारे ८४लाख रुपये निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


या प्रकल्पासंदर्भात संबंधित विभागांच्या संयुक्त बैठका पार पडल्या असून भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच अधिक वेगाने राबवली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नव्या एमआयडीसीमुळे मावळ तालुक्यात औद्योगिक विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.










Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने