Pune Crime : नसरापूर प्रकरणी न्यायालयात तीन लहान मुलांची साक्ष

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या तीन लहान मुलांनी अत्यंत निर्भीडपणे न्यायालयासमोर आपली साक्ष नोंदवली. आरोपी भीमराव कांबळे यानेच पीडित मुलीला पत्र्याच्या शेडमध्ये नेल्याचे आणि त्यांना पाहून दगड मारल्याचा संपूर्ण घटनाक्रम या प्रत्यक्षदर्शी मुलांनी न्यायालयाला सांगितला.


पुण्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी (२ जून) या तीनही प्रत्यक्षदर्शी मुलांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. या खटल्यातील आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५ वर्ष, रा. भोर) याच्याविरुद्ध राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. घटनेच्या दिवशी आरोपी पीडित मुलीला गोठ्याशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन जात असताना तेथे खेळत असलेल्या तीन मुलांनी त्याला पाहिले होते. मुलांनी शेडच्या फटीतून पाहिले असता आरोपी मुलीसोबत दिसून आला होता. मुलांनी न्यायालयात सांगितले की, त्यांना पाहिल्यानंतर आरोपीने त्यांच्या दिशेने दगडही फेकून मारले होते. या मुलांनी यापूर्वीच येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. आता सुनावणीदरम्यान येरवडा जेलमधून 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग 'द्वारे हजर करण्यात आलेल्या आरोपीला मुलांनी न्यायालयातही अचूक ओळखले.


८२ साक्षीदारांची यादी


या अत्यंत संवेदनशील खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ८२ साक्षीदारांची यादी न्यायालयासमोर सादर करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या १६ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी न्यायालयासमोर नोंदवून घेतली आहे. दरम्यान, बचाव पक्षातर्फे अॅड. हिंमतराव सूर्यवंशी यांनी या साक्षीदारांची उलटतपासणी घेतली. प्रत्यक्षदर्शी मुलांच्या या खंबीर साक्षीमुळे सरकारी पक्षाची बाजू कोर्टात अधिक मजबूत झाल्याचे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि