Dr.BabaSaheb Ambedkar : माता रमाबाई नगरातील आंबेडकर पुतळा परिसर होणार आकर्षक..

आठवडाभरात आराखडा सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्षांचे निर्देश...


मुंबई : घटकोपर पूर्व येथील माता रमाबाई आंबेडकर नगर परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात यावा, तसेच परिसरातील अनधिकृत बांधकामांची शहानिशा करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या मागणीनंतर विधानसभा उपाध्यक्षांच्या कार्यालयात यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बृहमुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए,म्हाडा विभागाचे अधिकारी आणि पुतळा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


बैठकीत बोलताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, माता रमाबाई आंबेडकर नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हा सामाजिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून परिसराचे नियोजनबद्ध सुशोभीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी पुतळा परिसरातील रस्ते, पदपथ, प्रकाशयोजना, स्वच्छता व्यवस्था, संरक्षक भिंत, हरित पट्टा तसेच नागरिकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आराखडा तयार करण्यात यावा.तसेच पुतळ्याभोवती झालेल्या अनधिकृत बांधकामांची संबंधित विभागांनी तातडीने शहानिशा करावी. नियमबाह्य आढळणाऱ्या बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करून परिसर मोकळा करण्यात यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. यामुळे पुतळ्याचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना स्वच्छ व सुस्थित परिसर उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले.


बैठकीदरम्यान सुशोभीकरणाच्या कामांचा सविस्तर प्रस्ताव तयार करून पुढील आठवड्यात सादर करण्यात या परिसराचा विकास करताना स्थानिक नागरिकांच्या भावना आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन कामे करण्यात यावीत.असे निर्देशही उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने