Nashik : नाशिकमध्ये आणखी एक ‘बिल्डर बॉम्ब’! एनए प्लॉटच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक

Nashik :  नाशिकमध्ये म्हाडा घोटाळ्याची (Mhada Scam) चर्चा सुरू असतानाच आता आणखी एका जमीन फसवणूक प्रकरणाने खळबळ उडवली आहे. एनए प्लॉट बनवून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप शहरातील नामांकित बिल्डर्स आणि विकासकांवर करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात (Sarkarwada Police Station) तब्बल ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अॅड. हेमंत सुरेश सातभाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मखमलाबाद शिवारातील वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नियोजित ले-आउटमधील प्लॉट विक्रीत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. फिर्यादीनुसार, संशयितांनी एनए प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले. सातभाई यांनी १९९८ मध्ये सभासदत्व घेत प्लॉट क्रमांक १२५ साठी संपूर्ण रक्कम भरली होती. त्यांना अलॉटमेंट लेटरही देण्यात आले. मात्र, त्यानंतर कायदेशीर खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ करण्यात आली.



सातभाई यांनी सन १९९८ मध्ये या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. संशयित बिल्डर्सच्या शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने एन. प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर सातभाई यांनी प्लॉट नंबर १२५ (क्षेत्रफळ ३६० चौरस वार) साठी संपूर्ण रक्कम भरली आणि त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंटदेखील देण्यात आले. परंतु, संशयितांनी (Suspected) कायदेशीर खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली.



सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल


धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीने पैसे भरलेला हाच प्लॉट संशयितांनी कथितपणे बनावट खरेदीखताद्वारे २४ डिसेंबर २०२० रोजी दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर अशाच प्रकारे इतर अनेक सभासदांचीही फसवणूक झाल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी फसवणूक आणि एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. दरम्यान, अटक टाळण्यासाठी काही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर येत आहे.


दरम्यान, अॅड. हेमंत सुरेश सातभाई (५३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police ) संशयित जितेंद्र मनोहरदास ठक्कर, काश्मिरा राजेंद्र शहा, अनघा यशवंत गुजर, बाबूलाल मणिलाल शहा, राजेश बाबूलाल शहा, रोहित मणिलाल शहा, सुरेंद्र मणिलाल शहा, अश्विन गोवर्धनदास जसपरा, राजेंद्र रसिकलाल शहा आणि संस्थेचे पदाधिकारी शरद कुटे व भास्कर आनंदराव पवार अशा एकूण ११ जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलमे आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम अन्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला आहे.


नाशिकमधील या नव्या जमीन घोटाळ्यामुळे बांधकाम व्यावसायिकांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


 
Comments
Add Comment

तडजोड नको! एअर इंडिया इमारत आणि आमदार निवासाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे आदेश

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक घेत प्रमुख विकासकामांचा थेट

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

India vs Zimbabwe Women T20: स्मृती मंधानाच्या नेतृत्वात पहिली टी20 मालिका, कधी आहे सामना जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघात आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टी20 मालिका खेळली जाणार आहे. तीन

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.