Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी गुरुवारी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विधानपरिषद निवडणुकीच्या धामधुमीत झालेल्या या अनपेक्षित भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (Political News)

या भेटीविषयी शरद पवार यांनी समाजमाध्यमांवरून माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, "राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई येथील सिल्व्हर ओक या माझ्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्यातील ज्वलंत कांदा प्रश्न, सहकार क्षेत्र व सहकारी संस्थांशी निगडीत विविध विषय, त्याचप्रमाणे रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सखोल चर्चा केली."

अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवारांची भेट घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १२ मे रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही 'सिल्व्हर ओक'वर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे तटकरे यांच्या आधी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही शरद पवारांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते.
Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने