Parali Crime News : परळी हादरली! मित्राची चक्क दगडाने ठेचून हत्या; रेल्वे रुळावर मृतदेह ठेवून आत्महत्येचा रचला बनाव

बीड : परळी परिसरात पैशांच्या किरकोळ देवाणघेवाणीच्या वादातून ३६ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी खून केल्यानंतर मृतदेह रेल्वे रुळावर ठेवून आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला, मात्र मोकाट कुत्र्यांनी मृतदेह बाजूला ओढल्यामुळे हा संपूर्ण डाव फसला. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी वेगाने कारवाई करत मयताच्या दोन मित्रांना अटक केली आहे. परळी (Parali Crime News) तालुक्यातील वरवटी आणि लेंडेवाडी शिवारात ही घटना घडली असून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, मयत आणि आरोप हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. तिघे कारमधून परळी तालुक्यातील वरवटी शिवारात गेले होते. तिथे त्यानंतर त्यांनी दारूची पार्टी केली. या पार्टीदरम्यान पैशांच्या देवाणघेवाणीवरून तिघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद इतका चिघळला बाजूला पडलेला मोठा दगड उचलून डोक्यात मारला.बेशुद्ध पडल्यानंतरही नशेत असलेल्या आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. (Parali Crime News)


घटना घडल्यानंतर घाबरलेले आरोपी मृतदेहाजवळच थांबले होते. त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी आणि रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा भास निर्माण करण्यासाठी त्याचा मृतदेह कारमध्ये टाकला. त्यांनी हा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर नेऊन ठेवला आणि तेथून पळ काढला. मात्र, आरोपी निघून गेल्यानंतर परिसरातील मोकाट कुत्र्यांनी मृतदेह ओढत रेल्वे रुळांच्या बाहेर आणला. रक्ताने माखलेला मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आल्यानंतर परळी परिसरात खळबळ उडाली. (Parali Crime News)



घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाईल कॉल रेकॉर्ड्स आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे परळी ग्रामीण पोलिसांनी संशयितयांना ताब्यात घेतले. (Parali Crime News)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी