Dhule : MSP ज्वारी बिलासाठी 5 हजारांची लाच; धुळे तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक ACBच्या जाळ्यात

Dhule ACB Action : धुळे (Dhule) तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक तथा शासकीय गोदाम व्यवस्थापकाला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाइन बिल प्रक्रिया पुढे सरकवण्यासाठी शेतकऱ्याकडे लाचेची मागणी करून ती स्वीकारल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई केली. मनिष महेश बागुल (वय 30) (Manish Mahesh Bagul) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.



MSP ज्वारी बिलासाठी 5 हजारांची लाच


मिळालेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील अंचाडे (Anchade) गावातील एका शेतकऱ्याने आणि त्यांच्या पत्नीने स्वतःच्या शेतातील ज्वारी महाराष्ट्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी (Online registration) केली होती. नियमानुसार त्यांनी ज्वारीचा माल धुळे येथील शासकीय गोदामात जमा केला होता.


मात्र, ज्वारीची मोजणी झाल्यानंतर आणि पावत्या दिल्यानंतर पुरवठा निरीक्षक मनिष बागुल (Manish Mahesh Bagul) याने शेतकऱ्याला बाजूला बोलावून ज्वारीचा दर्जा चांगला दाखवण्यासाठी तसेच ऑनलाइन बिल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 5 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. एवढंच नाही, तर पैसे न दिल्यास बिल प्रक्रिया रोखण्याची धमकीही दिल्याचं समोर आलं आहे.



शेतकऱ्याकडून थेट ACB कार्यालयात तक्रार


शासकीय कामासाठी लाच देण्यास नकार देत संबंधित शेतकऱ्याने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात (ACB)  तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर पंचांसमक्ष लाचेची मागणी झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने शासकीय गोदामात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे शेतकरी पैसे देण्यासाठी गेल्यानंतर मनिष बागुल याने 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतलं. या प्रकरणी त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Anti-Corruption Act) धुळे शहर पोलीस ठाण्यात (Dhule City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची होणारी अडवणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.



लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन


दरम्यान, शासकीय, निमशासकीय अधिकारी-कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करणाऱ्या व्यक्तींकडून कोणत्याही कामासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (Anti-Corruption Department) संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे. विभागाचा टोलफ्री क्रमांक १०६४ असून धुळे कार्यालयाचा (Dhule Office) व्हॉट्सअॅप क्रमांक ७७९८१६१०६४ आहे.

Comments
Add Comment

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे