Nashik : शेतात काम सुरू असतानाच ओढावला मृत्यू, दिंडोरीत वीजवाहक तार पडून महिला ठार

Nashik : दिंडोरी ( Dindori ) तालुक्यातील कौडासर (Kaudasar) येथे अवकाळी पावसादरम्यान ११ केव्ही वीजवाहक तार तुटून शेतात पडल्याने झालेल्या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ व श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कारवाईची मागणी केली. माया दिगंबर वाघेरे (Maya Digambar Waghare) (वय ३५, रा. कोहोर, ता. पेठ) यांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकला कृष्णा राऊत (Chandrakala Krishna Raut )(वय ५०, रा. कौडासर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, कौडासर येथील कृष्णा पुंडलिक राऊत यांच्या शेतात काकडी वेल बांधणीचे काम सुरू होते. राऊत यांच्या मेहुणी माया वाघेरे या पाहुण्या म्हणून आल्या होत्या. त्या शेतातील कामात मदत करत असताना सायंकाळी अचानक अवकाळी पावसास सुरुवात झाली. त्याचवेळी ननाशी-पिंपळगाव धूम (Nanashi-Pimpalgaon Dhoom) मार्गावरील ११ केव्ही वीजवाहक तार तुटून शेतात पडली.


तुटलेल्या वीजवाहिनीचा धक्का माया वाघेरे यांना बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चंद्रकला राऊत याही विजेच्या संपर्कात आल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Nanashi Primary Health Center) उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.



महावितरणचा हलगर्जीपणा, ग्रामस्थांचा आरोप


घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, नातेवाईक तसेच श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.


परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दिंडोरी पोलीस ठाण्याचे (Dindori Police Station) पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व पेठ पोलीस ठाण्याचे (Peth Police Station) पोलीस निरीक्षक समीर केदार यांनी पोलिस बंदोबस्तासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून परिस्थिती शांत केली.



दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन


अखेर महावितरणच्या पेठ विभागाचे सहाय्यक अभियंता कुमावत यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, या घटनेमुळे कौडासर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून

Ulhasnagar Stamp Duty Amnesty Scheme : उल्हासनगरवासीयांना दिलासा! अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : उल्हासनगर शहरातील प्रलंबित मुद्रांक शुल्क प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी "महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय

Maharashtra Professor Recruitment : प्राध्यापकांच्या भरतीसाठी मुलाखतींचे 'सीसीटीव्ही रेकॉर्डिंग' बंधनकारक

- उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय; अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमध्ये ५ हजार १२ पदांची भरती मुंबई :