तेलाच्या टाकीत उतरले आणि काही क्षणांत घडलं भयंकर; जहाजावरील मुख्य अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई: मुंबईजवळ समुद्रात कार्यरत असलेल्या एका तेलवाहू जहाजावर दुर्दैवी घटना घडली असून जहाजावरील ४३ वर्षीय मुख्य अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. साफसफाईच्या कामादरम्यान तेलाच्या टाकीत कोसळल्याने हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत व्यक्तीचे नाव हर्षा गोपालन राजन असून ते मूळचे चेन्नई येथील रहिवासी होते. ते 'जग आबा' या तेलवाहू जहाजावर मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. ही घटना १ जून रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, जहाजावरील स्लोप पोर्ट विभागातील साफसफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी राजन तेलाच्या टाकीत उतरले होते. त्यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते टाकीतच कोसळले. हा प्रकार लक्षात येताच जहाजावरील इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले आणि त्यांना बाहेर काढले.



यानंतर जहाजावरील वैद्यकीय सुविधेत त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांनी सॅटेलाइट कम्युनिकेशनद्वारे कंपनीच्या डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी प्राथमिक माहितीच्या आधारे राजन यांच्यात जीवनाची कोणतीही चिन्हे दिसत नसल्याचे सांगितले.


दरम्यान, जहाज मुंबई बंदराच्या दिशेने येत असताना याबाबत यलो गेट पोलिसांना माहिती देण्यात आली. 3 जून रोजी जहाज भाऊचा धक्का येथे पोहोचल्यानंतर राजन यांना तातडीने सर जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात कोणतीही दुखापत किंवा संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. कुटुंबीयांनीही मृत्यूबाबत कोणताही संशय व्यक्त केलेला नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

BMC News : महापालिकेतील माजी नगरसेवकांना निवृत्ती वेतन?, महापालिकेत पुन्हा नगरसेवकांकडून झाली मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांना पेन्शन देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु

Mumbai Transport News : बेस्ट उपक्रमाच्यावतीने 'बेस्ट रिक्षा’, 'बेस्ट टॅक्सी' सेवा, भाजप नगरसेवकांनी बेस्टला नफ्यात आणण्यासाठी अनोखी मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) बेस्ट उपक्रम तोट्यात चालला असून या उपक्रमाला नफ्यात आणण्यासाठी आता नगरसेवकांनी

Goregaon-Mulund Link Road Project : लोकार्पणाची घाई पण, अद्यापही विद्याविहार, गोेरेगाव पुलांची काही कामे शिल्लकच

मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके

Manori Desalination Project : मनोरीतील समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाला कोळी बांधवांच्या विरोधाची किनार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकरांची वाढती लोकसंख्या, पाण्याची मागणी लक्षात घेता पाण्याच्या मागणीतील ही तफावत

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म