Nashik Crime : गळालेल्या ऑईलमुळे उघडकीस आली बीएसएनएल केबल चोरी; आंतरजिल्हा टोळीतील चौघे जेरबंद ; नेमकं प्रकरण काय ?

नाशिक : सरकारी मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्या टोळीचा नाशिकरोड पोलिसांनी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ची भूमिगत केबल चोरी करणाऱ्या या टोळीकडून पोलिसांनी चोरीसाठी वापरलेला जेसीबी, मालवाहू टेम्पो आणि चोरीचा मुद्देमाल असा तब्बल १ कोटी ५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. विशेष म्हणजे, केबलमधून गळालेल्या ऑईलच्या खुणांमुळे या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. ( Nashik Crime News )




केबलमधून गळालेल्या ऑईलच्या खुणांमुळे गुन्ह्याचा उलगडा


पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, ३० मे रोजी रात्री ८ ते ३१ मे रोजी सकाळी १० वाजेदरम्यान नाशिकरोडमधील (Nashik Road) बिटको चौक परिसरात बीएसएनएलच्या (BSNL) भूमिगत केबलची चोरी झाली होती. चोरट्यांनी सिमेंटचा ढापा उघडून सुमारे ३५ लाख रुपयांची केबल यंत्राच्या सहाय्याने ओढून कापून नेली होती. याप्रकरणी बीएसएनएल अधिकारी बाळासाहेब कोटकर यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) फिर्याद दाखल केली होती.


गुन्हा दाखल झाल्यानंतर १ जूनच्या रात्री सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी व गुन्हे शोध पथक बिटको चौक ते लॅम रोड (Bitco Chowk to Lam Road) परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना एक संशयास्पद मालवाहू टेम्पो भरधाव वेगाने जाताना दिसला. पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले असता टेम्पोच्या मागील भागातून ऑईल गळत असल्याचे दिसून आले. केबल कापताना बाहेर पडलेले हेच ऑईल असल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली.



चोरीची कबुली, चौघांना अटक


कसून चौकशीत संशयितांनी चोरीची कबुली दिली. टेम्पोची झडती घेतली असता बीएसएनएल केबलचे तुकडे आढळले. तसेच चोरीसाठी जेसीबीचा वापर केल्याचेही उघड झाले. या प्रकरणात वहाब नवाज (३५, भांडुप), सुरेश वैराळ (३७, भांडुप), बसंतलाल यादव (३८, चेंबूर) आणि कमलेशकुमार रविदास (२६, बिहार) या चौघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment

Bengaluru Metro : मेट्रो ठरली जीवनदायिनी! बंगळुरूमध्ये 18 मिनिटांत मानवी हृदयाची यशस्वी वाहतूक, Video Viral

बंगळूर :  बंगळूर शहरातील वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होतो. मात्र, बंगळूरच्या नम्मा

"अखेर मनातलं ओठांवर आलंच, हा सगळा खेळ..."; प्रशांत भूषण यांचा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई: सीजेपी आणि विरोधी पक्षांकडून दिल्लीत सुरू असलेले आंदोलन म्हणजे सत्तेसाठी सुरू असलेला खेळ आहे, असा

IND vs WI: वेस्ट इंडिजसमोर भारताचा 'अभेद्य किल्ला'! 7 वर्षांचे वर्चस्व राखण्याचे टीम इंडियासमोर आव्हान

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेचा निर्णय शेवटच्या सामन्यावर येऊन ठेपला आहे. 17

Yo Yo Honey Singh : 'यो यो हनी सिंग'च्या अडचणीत मोठी वाढ! आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलचा मोठा दणका

प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार हिरदेश सिंग, ज्यांना जगभर 'यो यो हनी सिंग' (Yo Yo Honey Singh) या नावाने ओळखले जाते, त्यांच्यामागील

Prime Video Chaar Yaar : प्राइम व्हिडिओच्या ‘चार यार’चा ट्रेलर प्रदर्शित; २००० च्या दशकातील मुंबईत उलगडणार गुन्हेगारी आणि मैत्रीची अनोखी कहाणी!

एक्सक्लुझिव्ह ओरिजिनल्ससाठी ओळखली जाणारी भारतातील आघाडीची स्ट्रीमिंग सेवा प्राइम व्हिडिओने आज आपल्या आगामी

Versova Beach Dead Body : वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गोणीत सापडला मृतदेह; 6 आरोपींना अटक

मुंबई : मुंबईतील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर 1 ऑक्टोबर रोजी गोणीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.