ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय


Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास आणि वापरात बदल मंजुरीचे राज्य शासनाचे अधिकार आता थेट जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त स्तरावर विकेंद्रित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार हा बदल झाला आहे. यामुळे प्रशासन गतिमान तर होईलच शिवाय जनतेचा पैसा, वेळ , प्रवास यामुळे वाचेल. ​मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शासकीय आदेशाच्या स्वरुपातले परिपत्रक काढण्यात आले आहे.



​शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतरण, पुनर्विकास, अतिरिक्त एफएसआय (FSI) किंवा टीडीआर (TDR) वापरण्यासाठी आतापर्यंत जनतेला मंत्रालयाची मान्यता लागत असे. आता हे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यामुळे स्थानिक पातळीवरच फायलींचा वेगाने निपटारा होईल. प्रशासकीय गतिमानता वाढवण्यासाठी पूर्वीच्या २८ डिसेंबर २०१५ आणि १७ सप्टेंबर २०१६ रोजीच्या अधिसूचना रद्द करण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतिमान प्रशासनाच्या संकल्पनेतून शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय पातळीवरील अधिकाऱ्यांना अधिकार दिल्यामुळे नागरिकांना आणि विकासकांना मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. यामुळे विकासकामांना मोठी गती मिळेल





  1. ​नझूल जमिनींना पूर्वलक्षी प्रभाव नाही.

  2. ​नजराणा आणि नियमानुसार शुल्क वसुली

  3. ​विसंगती असल्यास मूळ अटी लागू.

  4.  ​१० लाखांपर्यंतचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना.

  5.  ​२० लाखांपर्यंतचे अधिकार विभागीय आयुक्तांना.

Comments
Add Comment

MahaIT : महाआयटीच्या प्रणाली अद्ययावतीकरणामुळे शासकीय ऑनलाइन सेवा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान तात्पुरत्या बंद

मुंबई : महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (महाआयटी) मार्फत विकसित आणि देखरेख करण्यात येणाऱ्या राज्य

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६ जाहीर; हाँगकाँग, उत्तराखंड आणि सांगलीच्या मंडळांची बाजी!

मुंबई : राज्यात उत्साहात पार पडलेल्या ‘म

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने