Hawkers Plaza Dadar : दादर हॉकर्स प्लाझामध्ये गाळे, तरीही क्यु आर कोडसाठी ठरणार लाभार्थी?

दादर पश्चिमधील फेरीवाल्यांमध्ये जोरदार चर्चा, महापालिका काय घेणार निर्णय


मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या नोंदणीकृत ९९ हजार ४३५ क्यु आर कोड देण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येत असून यामध्ये सन २०१४च्या सर्वेमध्ये दादर हॉकर्स प्लाझामध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन केल्यानंतरही याच गाळेधारकांनी बाहेर फेरीचा व्यवसाय लावून आपले अर्ज सादर केले होते. त्यामुळे हॉकर्स प्लाझामध्ये (Hawkers Plaza) लाभार्थी ठरलेलेे फेरीवाले पुन्हा आता नव्याने पात्रता निश्चित करून क्यु आर कोडसाठी (QR Code) पात्र ठरले जाणार आहे. त्यामुळे हॉकर्स प्लाझामधील गाळेधारकांना लाभ मिळूनही त्यांना आता फेरीवाले म्हणूनही दावा केल्यामुळे स्थानिक फेरीवाल्यांवर अन्याय होत असून यापूर्वी ज्या फेरीवाल्यांना हॉकर्स प्लाझामध्ये गाळे देण्यात आले आहेत, त्यांना क्यु आर कोड देण्याची प्रक्रिया देताना अशा लाभार्थी फेरीवाल्यांना वगळण्यात यावे अशी मागणी फेरीवाल्यांकडूनच होत आहे.



मुंबईत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सन २०१४मध्ये करण्यात आलेल्या सर्वेमध्ये तब्बल ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांनी आपले अर्ज (Applications) सादर केले होते. यामध्ये केवळ ३२ हजार फेरीवाले पात्र ठरले होते. या पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यात येणार होते. परंतु न्यायालयाच्या निर्देशानुसार नोंदणीकृत ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांचा विचार केला जात असल्याने आता २० ठिकाणे सोडून अन्य ठिकाण फेरीवाल्यांना बसवण्यासाठी क्यु आर कोड देण्याची प्रक्रिया पार पाडली जात आहे. मात्र, याबाबत दादर पश्चिम येथील फेरीवाल्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.



दादर पश्चिम भागातील रेल्वे स्थानक (Dadar West Railway Station) परिसरातील फेरीवाल्यांना हटवून त्यांचे पुनर्वसन हॉकर्स प्लाझा इमारतीमध्ये करण्यात आले. त्यातील काहींना गाळे वितरीत करण्यात आले. परंतु हे गाळे भाड्याने त्यातील काही गाळेधारकांनी बाहेर फेरीचा व्यवसाय लावण्यास सुरुवात केली तर काही गाळे विकून पुन्हा रस्त्यांवर व्यवसाय करण्यास सुरुवात करत सर्वेमध्ये सहभागी होत आपले अर्ज दाखल केले. त्यामुळे ९९ हजार ४३५ फेरीवाल्यांमध्ये यातील काहींचा सहभाग असून एकदा सरकारी योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा एकदा हीच मंडळी फेरीवाला म्हणून क्यु आर कोडद्वारे पात्रता निश्चित करून घेत दुसऱ्या योजनेचाही लाभ घेणार असल्याचे फेरीवाल्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळे महापालिकेने दादर पश्चिममधील फेरीवाल्यांना क्यु आर कोड देण्याची प्रक्रिया राबवताना नाेंदणीकृत फेरीवाल्यांपैंकी हॉकर्स प्लाझामध्ये लाभार्थी आहेत काय याची तपासणी करून त्यांना या योजनेचा लाभ दिला जावा अशाप्रकारची मागणी फेरीवाल्यांकडून केली जात आहे. दादरमधील काही फेरीवाल्यांच्या म्हणण्यानुसार, आमचा विरोध नसला तरी शासकीय योजनेचा लाभ जर एकदाच दिला जातो, तर मग महापालिकेने ही कागदपत्रे पडताळून का पाहू नये. महापालिकेने हॉकर्स प्लाझामध्ये आतापर्यंत ज्यांच्या ज्याच्या नावावर गाळे वितरीत केले आहेत आणि त्यांनी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीमध्येही अर्ज केला असेल तर त्यांची कागदपत्रे तपासून निर्णय घ्यावा,हीच किमान मागणी असल्याचे फेरीवाल्यांची मागणी आहे.


फेरीवाल्यांमध्ये सध्या याची जोरदार चर्चा सुरु असून महापालिका आता या सर्वांची पात्रता निश्चित करता यापूर्वी त्यांनी याचा लाभ घेतला होता हे पडताळून पाहते का कि सरसकट त्यांची पात्रता निश्चित करून देते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

Ram Mansion Purchase : सिद्धिविनायक मंदिराजवळीम राम मेन्शनच्या खरेदी व्यवहाराला परवानगी

मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराला लागून असलेल्या राम मेन्शन सहकारी गृहनिर्माण

मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम; 17, 18 आणि 24, 25 ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रांवर शिबिरे

मुंबई : राज्यातील एकाही पात्र नागरिकाचे नाव मतदार यादीत समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये, या महत्त्वाच्या

BMC News : वरळीतील सांडपाण्यावर बायोगॅसपासून वीज निर्मिती; प्रकल्प काम 63 टक्के पूर्ण

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत वरळी येथे उभारण्यात येत असलेल्या 500 दशलक्ष लीटर

मुंबई उपनगरातील तीन नवीन कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई शहर व उपनगरातील कोळीवाड्यांचे सीमांकन अधिक स्पष्ट व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने

BMC School News : राज्याचे मुख्यमंत्री तसेच सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सर न्यायाधीश साकारणार शिक्षकांची भूमिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : स्मार्ट नागरिक’ हा नागरिकशास्त्र आणि घटनात्मक मूल्यांवरील अभ्यासक्रम तसेच डॉ.

शिवसेनेचा यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा दुष्काळग्रस्तांना समर्पित; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रमांची घोषणा

मुंबई : राज्यात सध्या भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या पाठीशी